भवानी सोयाबीन उत्पादक शेतकरी गटातील सदस्य उपस्थित
शिवशाही वृत्तसेवा, सांगली
सावर्डे ता.तासगाव येथे माती परीक्षण कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न. दिनांक 2/6/2023 रोजी सावर्डे येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सांगली ,कृषी विभाग तासगाव व वसंत प्रकाश कृषी विज्ञान केंद्र कांचनपुर आणि भवानी सोयाबीन उत्पादक शेतकरी गट सावर्डे यांचे संयुक्त विद्यमाने माती परीक्षण आणि क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी वसंत प्रकाश कृषी विज्ञान केंद्राचे मृदा व जल शास्त्रज्ञ श्री शैलेश पाटील साहेब,श्री विवेक पाटील कृषी तंत्रज्ञ आत्मा विभाग तासगाव,श्री शैलेश बुटे सहाय्यक कृषी तंत्रज्ञ आत्मा तासगाव ,कु.स्वाती बास्टे कृषी सहाय्यक सावर्डे ,HDFC ergo चे तालुका प्रतिनिधी श्री सागर कदम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत बास्टे मॅडम यांनी केले. यावेळी बोलताना श्री शैलेश पाटील म्हणाले की, आजपर्यंत बारा वर्ष झाले मी या क्षेत्रात काम करत असून सावर्डे सारखी परिस्थिती अनुभवयास मिळाली नाही आज इथले शेतकरी आमची वाट बघत आहेत कारण इतर गावात आम्ही गेल्यानंतर लोकांना गोळा करावे लागतात.
शेतकऱ्यांनी माती परीक्षण करताना घ्यावयाची काळजी या बद्दल विस्तृत अशी माहिती सांगितली त्याच बरोबर फळ पिकासाठी माती नमुने कसे काढायचे याची माहिती दिली तसेच खरीप पिकासाठी माती परीक्षण हे तीन वर्षांतून एकदा करावे ते ही आपल्या शेतात कोणतेही सेंद्रिय खत अथवा रासायनिक खते टाकण्या अगोदर माती नमुने काढावे म्हणजे योग्य माहिती आपल्याला मिळेल. गेल्या वर्षी आपल्या गावातील भवानी सोयाबीन उत्पादक शेतकरी गटाने माती परीक्षण करून त्यानुसार सोयाबीन या पिकासाठी खताची मात्रा दिली . परिणामी त्याचे उत्पन्न वाढले आणि त्यांचा फार्मर कप स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक आला त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो या गटाने आमच्या कृषी विज्ञान केंद्रास प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली. याचाच आदर्श गावातील सर्व शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा असेही सांगितले.
शेतकऱ्यांनी कोणतेही पीक घेताना माती परीक्षणच करून पिकाची लागवड करावी आणि माती परीक्षण करून तो अहवाल घरी न ठेवता त्याचे वाचन करून तो अमलात आणावा हीच काळाची गरज आहे . यावेळी पीक विम्याची माहिती देताना कदम म्हणाले की की,सावर्डे गावातील शेतकऱ्यांच्या मागणी नुसार मनेराजुरी सर्कल मध्ये रेन गेज मीटर बसवण्याचे नियोजन केले आहे याबाबत कालच मा.तहसीलदार साहेब यांच्या सोबत बैठक झाली आहे त्याची स्थळ पाहणी सुद्धा केली आहे तरी सर्वांनी 1ते 14 जून पर्यंत द्राक्ष पीक विमा आपल्या नजीकच्या सोसायटीत किंवा जवळच्या CSC सेंटर मध्ये भरून घ्यावेत .यावेळी शैलेश बूटे यांनी आत्मा विभाग तासगाव यांच्याकडील योजना बद्दल माहिती दिली तसेच शेतकऱ्यांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी गट नोंद करावेत .कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री विजय जाधव ग्रामपंचायत सदस्य होते यावेळी जाधव मळा येथील महिला पुरुष बहुसंख्य संख्येने उपस्थित होते त्यांनी बरेच प्रश्न उपस्थित केले व शंकांचे निरसन केले आभार संजय लक्ष्मण जाधव यांनी मानले यावेळी भवानी सोयाबीन उत्पादक शेतकरी गटातील सदस्य उपस्थित होते राजाराम माने,परशुराम जाधव,व्यंकट पाटील मारुती निकम प्रमोद निकम , शिवाजी दत्तू माने सर, सोपान जाधव,नेताजी जाधव,धनाजी जाधव विशाल जाधव अशोक जाधव आदी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा