maharashtra day, workers day, shivshahi news,

तहसीलदार महसूल रेतीमाफिया सगळे एकाच माळेचे मणी

धनंज गोदावरी नदीतून  अवैधपणे रेती चोरी होताना कुठलीच कारवाई नाही.
Stealing sand illegally , Dhananj Godavari river , naigaon , nanded , shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)

गेल्या अनेक दिवसापासून नायगाव तालुक्यातील मौजे धनज येथील गोदावरी नदीपात्रातून बुडबुडी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने सरासपणे अवैधरित्या रेती उपसा चालू असून संबंधित तहसीलदार गजानन शिंदे यांनी रेती माफियावर आजवर तरी कुठलीच कारवाई केली नाही आणि त्या रेती चोरीला लगाम लागला नाही यामध्ये तहसीलदार खुद्द सहभागी असल्याचे परिसरातून चर्चेला उधाण आले आहे. सदर गावातील रेती चोरी होत असताना याबाबत अनेक बातम्या प्रकाशित झाल्या अनेक सामाजिक संघटनेचे निवेदनही दाखल झाले असताना त्या बातम्या विषयी व निवेदनकर्त्याविषयी तहसीलदार गजानन शिंदे  यांनी मौन धरले आहे.

  शासनाची कुठलीच सध्या तरी रेती उपसा करण्याबाबत परवानगी नसतानाही शासन प्रतिनिधी म्हणून नायगाव तालुक्याचे तहसीलदार गजानन शिंदे येथे कार्यरत असताना गेल्या अनेक दिवसांपासून धनंज येथील गोदावरी नदीपात्रातून बुडबुडी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने सरासपणे रेतीचा उपसा केला जात आहे   रेतीमाफीयाची ताकद एवढी मोठी केवळ तहसीलदार गजानन शिंदे यांच्यामुळेच झालेली आहे कारण संबंधित तलाठी मंडळ अधिकारी यांनीही मूग गिळून शांत आहेत तर तहसीलदार गजानन शिंदे यांनी रेती माफीयांना आपले हात ओले करून पाठीशी घालण्याचे काम करीत आहे म्हणून कुठल्याही बातमीवर किंवा तक्रार कर्त्याच्या निवेदनावर याचा परिणाम उमटत नाही तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तहसीलदार शिंदे यांच्या बाबत चौकशी करून रेतीमाफीयासह शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी निवेदन करते मागणी करत आहेत.

  सदर धनज येथील रेती प्रकरणाबद्दल युवा सेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख शिवाजी कुंटूरकर निवेदन देऊन सदर रेतीमाफीयावर कठोर कारवाई नाही झाल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल अशी ही तक्रार दिली होती पण त्या तक्रारीचा परिणाम देखील तहसीलदार शिंदे यांच्यावर झालेला नाही तेव्हा उपजिल्हाधिकारी साहेबांनी शिंदे यांच्या बाबत चौकशी करावी आणि त्यांना कारवाई सह बडतर्फे करण्यात यावे अशी ही मागणी निवेदन करतेनी दिलेली आहे

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  तहसीलदार गजानन शिंदे यांची चौकशी करून कारवाई नाही केल्यास आपल्या स्वार्थापोटी शिंदे हे आखा नायगाव तालुका देखील विकून टाकतील अशीही चर्चा नायगाव तालुक्यामध्ये होत आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !