व्रतस्थ पत्रकार बंधू चा म्हणजेच संदिप कांबळे यांचा आज वाढदिवस
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
प्रगल्भ जाणिवा आणि समाज मनाचा ध्यास घेत समाजातील गोरगरीब, अपेक्षित,वंचित आणि सामान्य माणसाच्या समस्यांनी जे पत्रकार व्याकुळ आणि व्यतीत होतात आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी आपली लेखनी झिजवितात ते पत्रकार खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या सुदृढ मनाचा मानबिंदू ठरतात.
गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत आणि दलित, पददलित, उपेक्षित आणि वंचित घटकांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात आपले हे पत्रकारितेचे हत्यार उपसून सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आणि त्याच्या न्याय हक्कासाठी खंबीरपणे त्याच्या पाठीमागे उभे टाकून समाजाच्या उत्थानासाठी आणि सामान्य माणसाच्या कल्याणासाठी आपली लेखणी झिजविणारे बंधूवर्य संदिप कांबळे हे नाव पत्रकारितेच्या क्षेत्रात आज परिचित होत आहे.
कुलस्वामिनी संदेश या दैनिकात ते सध्या नांदेड विभागीय संपादक तथा नांदेड जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करतात. थोड्या कालावधीतच कुलस्वामिनी संदेश या दैनिकाने नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे काम संदिप कांबळे यांच्या लेखणीच्या माध्यमातून होताना दिसते. संदीप कांबळे हे सामान्य कुटुंबात जन्माला आलेले असून त्यांचा जन्म ०५जून १९९० साली नरसी तालुका नायगाव येथे एका सामान्य कुटुंबात झाला.
संदिप कांबळे यांनी आपले महाविद्यालयीन आणि पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण करून आता ते पत्रकारितेच्या क्षेत्रात आपले नवे आयाम शोधतांना आम्ही त्यांच्याकडे पाहतो आहोत. समाजाची तळमळ आणि कळकळ असणारा आणि सामान्य माणसाला हवाहवासा वाटणारा हा पत्रकार बंधु नेहमीच रंजल्या गांजल्या च्या आणि ज्याच्या पाठिमागे कोणीच नाही अशांच्या पाठीमागे उभा राहून मी तुमच्यासोबत आहे ही जाणीव देणारा हा पत्रकार बंधु सामान्य माणसाला आपला वाटत आलेला आहे.
समाजाच्या सामान्य माणसाच्या आणि सामान्य तळागाळातील समाजाच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या जाणून घेऊन अगदी निष्ठापूर्वक त्या समस्या सोडविण्यासाठी त्यांचा पाठपुरावा अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा वाटत आला आहे. खरंतर पत्रकारितेचे हे क्षेत्र उपेक्षित माणसाला न्याय मिळवून देणारे एक हत्यार असून त्या हत्याराचा उपयोग संदिप कांबळे यांनी अनेक ठिकाणी वापरून अशा उपेक्षित माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न आपल्या लेखणीच्या माध्यमातून केला आहे.
संदीप कांबळे या ध्येयवेढ्या आणि आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक आणि निष्ठापूर्वक काम करणाऱ्या कार्यकर्त्याकडे वाईस ऑफ मीडिया नायगाव शहराध्यक्ष, प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ नांदेड जिल्हा उपाध्यक्ष यासह अनेक पत्रकारितेच्या क्षेत्रातील जबाबदारीची पदेही त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे लीलया सोबत आली आहेत. हे त्यांच्या लेखणीचे आणि कार्यकर्तृत्वाचे मोठेपण म्हणावे लागेल.
संदिप कांबळे हे सामाजिक बांधिलकी जपणारे दृष्टे पत्रकार असून समाजाच्या अनेक प्रश्नासाठी ही ते सातत्याने आग्रही राहत आले आहेत. लोकस्वराज्य आंदोलन या सामाजिक संघटने मध्ये काम करत असताना समाजाच्या प्रबोधनासाठी आणि परिवर्तनासाठी आणि समाजातील उच्च शिक्षणाच्या प्रसारणासाठी संदिप कांबळे यांनी नेहमीच आपले योगदान दिले आहे.
अशा या व्रतस्थ पत्रकार बंधू चा म्हणजेच संदिप कांबळे यांचा आज वाढदिवस वाढदिवसाच्या निमित्ताने बंधू व संदिप कांबळे यांना खूप खूप शुभेच्छा
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा