हप्ते खाऊ अधिकार्याच्या डोळ्यांवर पट्टी ?
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
संबंधित अधिकाऱ्याची डोळ्यांवर पट्टी ?गुटखा माफिया चे दादागिरी चालूहप्ते खाऊ अधिकार्याच्या निष्काळजीपणामुळे,तामसा परिसरात अवैध गुटखा विक्री व दारू विक्री मोठ्या प्रमाणात चालू.
तामसा परिसरात गुटखा माफी याने आपले चांगलेच प्रस्थ निर्माण करून आवैध गुटखा विक्री करण्याचे तामसा व हदगाव केंद्रबिंदू ठरले आहे की काय अशी शंका निर्माण होत आहे तर ग्रामीण भागात गाव तेथे देशी दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याकारणाने तरुण वर्ग व्यसनाधीन होऊन गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जात आहेत नशीले हे पदार्थ सेवन करून अनेक आजाराने त्रस्त असल्याचे ग्रामीण भागातील पाल्याकडून ऐकावयास मिळत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे तामसा पोलीस स्टेशन आत हद्दीत 40 ते 50 खेडे येतात व तामसा बाजारपेठ ही हदगाव तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून संबोधले जाते हदगाव शहरापेक्षा बार देशी दारू दुकाने जास्त आहेत यांचा सेल स्थानिक लेवल तर होतो परंतु नियमबाह्य रात्री बे रात्री ड्राय डेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात दारू विक्री होते व गाव तिथे सेल व्हावा असे वरिष्ठांचे अलिखित सांगणे आहे की तामसा शहरातून खेड्यात देशी दारू घरपोच डिलिव्हरी दारू विक्रेत्याकडून होत असते त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या देशी दारू विक्री होत असल्याचे चित्र आजही पहावयास मिळत आहे यामुळे तरुण पिढी व्यसनाकडे वळल्यामुळे तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहे तेव्हा वेळीच तामसा पोलिसांनी व उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी धाड सत्र चालू करून अवैध दारू विक्री बंद करावी अशी मागणी होत आहे.
अवैध गुटखा विक्री तेजित तामसा येथील एक गुटखा माफीया असून राज्यात गुटखा विक्री बंदी असून सुद्धा मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत आहे महाराष्ट्रातील तामसा शहर हे तेलंगणा सीमावरती भागात असल्याने येथे तेलंगणा राज्यातून हैदराबाद निजामबाद येथून मोठ्या प्रमाणात तामसा येथे गुटखा येतो व येथून सीमा वरती असलेले मध्य प्रदेश व राज्यातील मोठमोठ्या शहरांना गुटखा पुरवठा करण्याचे काम तामसाच्या राजरोस पणे होत असते सर्वत्र गुटखा पुरवठा करण्याचे केंद्रबिंदू हे तामसा शहर असून त्यामुळे अनेक तरुण कॅन्सर सारखा रोगांना सेवन केल्यामुळे निमंत्रण देत आहेत मागील काही दिवसापूर्वी तामसा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरवले साहेब यांनी मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करून योग्य ती कारवाही केली होती परंतु त्यामुळे मालकाचे नाव न घेता ड्रायव्हर कार्यवाही झाली होती आता तात्काळ येथील गुटका माफियाच्या पोलिसांनी धाड टाकून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा