तक्रार करूनही अद्याप काहीच कारवाई नाही
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधि आरिफ शेख)
सिंदखेड राजा तालुक्यामधील गाव लिंगा देवखेड येथील काही ग्रामस्थांनी खडकपूर्णा नदीपात्रामध्ये अवैध रेती उपसा केला जात असल्याची तक्रार सिंदखेड राजा तहसीलदार यांच्याकडे करून सुद्धा आजपर्यंत तक्रारीची दखल घेण्यात आली नाही अशा प्रकारे लिंगा, देवखेड येथील ग्रामस्थ कैलास कासतोडे शरद खरात विकास खरात गजानन मुंडे रामदास जावे नारायण चव्हाण व इतर ग्रामस्थांनी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की लिंग देवखेड गावाच्या मधोमध वाहणारी खडक पूर्णा नदी गावाच्या अगदी जवळ असल्यामुळे नदीपात्रामधून रात्रीच्या वेळेस रेती चोरली जात असल्यामुळे गावातील छोटी मुली व महिला यांच्या जीवित्वस भरधाव चालणारी वाहनामुळे धोका निर्माण झाला असल्यामुळे सबधित वाळू तस्करांना वेळोवेळी वाळू उपसा बंद करण्याकरिता सूचना दिल्या मात्र रात्रभर नदीपात्रामधून रेती काढून गावाच्या समोर रेतीचा ढीगाराकरून राज रोसपणे मन मानेल त्या पद्धतीच्या दराने दोन-तीन पट आकारणी करून विक्री केले जाते कोणत्याही प्रकारचा विचार न करता रात्रंदिवस हे काम उपसा चालू असतो.
याबाबत तहसीलदार सिंदखेड राजा यांना तक्रार करून सुद्धा कोणत्याही प्रतिबंध लावण्यात आला नाही त्यामुळे रेती तस्कर यांचे बळ वाढत असून काही सराईत रेती तस्कर आजही अवैध रेतीची तस्करी करत आहेत मात्र महसूल खाते हे आमच्या हातामध्ये असल्यासारखी वावरत आहेत हा प्रकार बंद व्हावा याकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शासनाची होणारी फसवणूक बंद करण्यात यावी अशी तक्रार लिंगा देवखेड येथील ग्रामस्थ विकास खरात गजानन मुंडे रामदास जायभाय शरद खरात नारायण चव्हाण इतर यांनी तहसीलदार सिद खेडराजा यांच्याकडे केली आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा