जय मल्हार मित्र मंडळाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार व पुजन करून मिरवणूकीला सुरुवात
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी सोयगाव तालुका रईस शेख
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा व टिटवी येथे जय मल्हार व बजरंग मित्र मंडळाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली मिरवणुकीला सुरुवात पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पूजन करून मिरवणुकीला दुपारी चार वाजता ट्रॅक्टर मध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा प्रतिकात्मक पुतळा ठेवून मिरवणुकीला प्रारंभ झाला या कार्यक्रमांमध्ये जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यात पारंपारिक पद्धतीने धनगरी नृत्य लहान मुलांनी व मुलींनी परिधान केलेले फेटे व गावातील महिलांनी पिवळ्या कलरच्या साड्या परधान केल्या होत्या.
अनेक युवकांनी व गावातील सावळदबारा ग्रामपंचायत च्या वतीने संरपच श्रीमती शिवगंगा चोपडे व उपसरपंच मोहम्मद आरिफ यांनी ही ग्राम पंचायत मध्ये पुण्यश्लोक देवी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी गावातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह याच्या ही पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले मिरवणुकीमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये याकरता फर्दापूर पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सावळदबारा बीट जमादार मिरखा तडवी पोलीस शिवदास भोपाल यांचा चोख बंदोबस्त होता
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा