शुकताल क्षेत्र येथे आज भागवत कथेची सांगता
शिवशाही वृत्तसेवा , नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
कलयुगात तरुणांसाठी नामस्मरण जेवढे महत्वाचे तेवढेच भागवत श्रवण ही महत्वाचे असून,मानवी जीवनाचा उद्धार होण्या साठी भागवत कथा श्रवण करणे हे सर्वोत्कृष्ट पुण्याचे कार्य आहे.भारतीय संस्कृतीच्या व्यवहारिक गणिती ज्ञान मानवि मनात वसवण्या साठी जीवनात तरुण जाण्यासाठी भागवत कथा श्रवण करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन भागवताचार्य तथा ह.भ.प.चैतन्य महाराज कंधारकर यांनी उपस्थित भक्त गणा समोर व्यक्त केले.
संस्कार टिकले की, संस्कृती टिकते,संस्कृती टिकली राष्ट्र टिकते राष्ट्र टिकले मानवी जीवन संस्कार मय घढते यामुळे संस्कार हा सर्वांचा मूळ पाय आहे.म्हणून प्रत्येकांनी भागवतकथेच्या सुसूत्राप्रमाणे प्रमाणे संस्काराचे संगोपन करीत जीवन प्रवास केल्यास त्याला परमोच्च आनंद भेटतो या साठी प्रत्येक श्रोता वर्गानी भागवत कथा ही श्रवण तर कराच शिवाय त्यातील संस्काराची आपल्या जीवनात उपयुक्तता करून जीवन कृतार्थ करावे असे विचार मांडले.
भागवताचार्य.ह.भ.प.चैतन्य महाराज कंधारकर यांच्या अमृत वाणीतून ११ मे ते १७मे चालू असलेल्या शुकताल येथिल भागवत कथेची सांगता आज गोकर्ण कथा व काल्याचे कीर्तन व महाप्रसाद वाटपाणे सांगता होणार आहे.शुकताल तीर्थ क्षेत्र येथे ११ मे पासून ह.भ.प. चैतन्य महाराज कंधारकर यांची भागवत कथा श्री संत साधुमहाराज संस्थान गंगाखेड यांची भागवत कथा साधू महाराज संस्थान समिती गंगाखेड यांच्या विद्यमाने श्रीक्षेत्र शुकताल उत्तरप्रदेश येथे होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून गुरुवर्य चैतन्य महाराज कंधारकर हे भागवत कथा व कीर्तनाच्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य करीत आहेत. समाजकार्य डोळ्यासमोर ठेवून श्री संत साधुराज यात्रा कमिटीच्या वतीने यंदाचा यात्रेचा कार्यक्रम भागवत कथा शुकताल येथे घेण्यात आला आहे. या कथेला महाराष्ट्रातून जवळपास ५०० भाविक सहभागी झाले आहेत.
शुकताल येथे दि. ११ मे ते १७ मे दरम्यान श्रीमद् भागवत कथा नामसंकीर्तन महोत्सव मोठ्या उस्थाहात साजरा केला जात आहे.दररोज काकडा, साधुसुधा ग्रँथ पारायण ,भागवत कथा,हरिपाठ, कीर्तन, भजन,ममहाप्रसाद आदी कार्यक्रम घेण्यात आले आहेत.साधुसुधा ग्रँथाचे पारायण तातू महाराज कंधारकर व शिवा महाराज सलगरकर,तर समिधा वाचन वसंत सलगरकर यांनी केले आहे.भागवत कथेला ऑर्गन ची साथ नकुल आळदीकर ,तबला साथ अमोल लाकडे नांदेड ,मृदंग साथ माधव उमरगा,गायन साथ तातू महाराज कंधारकर,ज्ञानेश्वर बोरगावकर,अरुण महाराज मोरे सोंनखेडकर, संतोष महाराज परभणीकर, यांनी दिली आहे .दि. १७ मे रोजी कथेची सांगता गोकर्ण कथा, काल्याच्या किर्तनाने व महाप्रसादाने होणार आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा