किनगांव राजा परिसरात चोरीचे प्रमाण वाढले
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
शेतात रोज रात्री झोपायला जाणारे शेतकरी काल रात्री झोपायला गेले नाही हीच संधी चोरट्याने साधून मध्यरात्री एक बैल जोडी आणि दोन छोटी जनावर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.
किनगाव राजा परिसरात गेल्या काही दिवसापासून गुरे चोरण्याची घटना दिवसेंदिवस वाढत आहे मात्र पोलिसांना या चोरांचा सुगावा लागत नाही . किनगाव राजा येथील शेतकरी अशोक मारुती काकड हे दररोज शेतात रात्री झोपायला जात असे. काल रात्री एक एप्रिल रोजी त्यांच्या घरचे कोणीही शेतात रात्री झोपायला गेली नाही ही संधी चोरट्यांनी साधली असून त्यांच्या शेतात असलेले एक जोडी बैल पांढऱ्या रंगाचे अंदाजे किंमत एक लाख रुपये व दोन छोटे जनावरे अंदाजे किंमत तीस हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले ही बाब 2 एप्रिल रोजी सकाळी शेतात जनावरे न दिसल्याने शोधा शोध सुरू झाली शेतकरी काकड यांनी गुरांचे बाजार या ठिकाणी सुद्धा शोध घेतला परंतु कुठेही त्यांची जनावरे दिसून आली नाही. फोटोमध्ये असलेले बैल जोडी कोणाला कोणाला आढळून आल्यास खाली दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा त्या व्यक्तीस योग्य ते बक्षीस दिले जाईल असे शेतकऱ्याने आवाहन केले संपर्कासाठी मो.9112724093
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा