सेवापूर्ती निमित्त आज गौरव सोहळा
नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
कला शिक्षक म्हणून संत ज्ञानेश्वर विद्यालय धुप्पा ता. नायगाव येथे दि.१६ जुलै १९८४ ला सेवेत रूजू झालेले बाबाराव गुरूजी शाळेला घर समजून व मुलांना दैवत समजून अधिकचा वेळ देत संस्था चालकांची मर्जी सांभाळत स्वकर्तृत्वाने सहशिक्षक, पर्यवेक्षक ते मुख्याध्यापक पदापर्यंत पोंहचत आज वयाची ५८ वर्ष पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जीवनाचा आलेख मांडण्याचा हा लेख व अल्पसा प्रयत्न.
२३ मार्च १९६५ रोजी गुरूजींच्या जन्म नायगाव तालुक्यातील खंडगाव (बेंद्री) येथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण खंडगाव येथे, माध्यमिकचे शिक्षण जनता हायस्कूल तर महाविद्यालयीन शिक्षण शरदचंद्र महाविद्यालय नायगाव येथे झाले.
१९८३ ला चित्रकलेची एटीडी पदविका मिळाल्यानंतर त्यांची १६/७/१९८४ संत ज्ञानेश्वर विद्यालयात कला शिक्षक म्हणून नेमणूक झाली. विद्यार्थ्यामध्ये चित्रकलेची आवड निर्माण करीत शाळेतच्या भिंती तर त्यांनी बोलक्या तर केल्याच पण विद्यार्थी मनावर आपल्या रंगाची उधळण करीत जीवन फुलविले. यासोबतच १९९२-९३ मध्ये जिल्हाधिकारी श्री अरूण गोयल साहेब यांच्या साक्षरता अभियानात सामील होऊन रात्रीचे शिक्षणाचे वर्ग घेत परिसरातील अनेक गावांत जाऊन असंख्य स्री-पुरूषांना साक्षर केले. या शिवाय शाळेतील, विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या विविध परीक्षेला बसवून शासकीय रेखा कला परीक्षा, एलिमेंटरी व इंटर मिजिएट परीक्षेला बसवून त्यांना अतिरिक्त गुणांमुळे अभियांत्रिकी व तंत्रनिकेतनच्या प्रवेसासाठी संधी उपलब्ध करून दिल्या.
याशिवाय केंद्र शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या "निर्मलग्राम पुरस्कारा " च्या राज्य स्तरीय तपासणी मध्ये त्यांची निवड व सुरक्षित जल अभियानामध्ये नांदेड, परभणी, लातूर साधन व्यक्ती म्हणून २०१०-११ मध्ये त्यांनी काम पाहिले. २०११-१२ मध्ये मागास क्षेत्र अनुदान निधी कार्यक्रमांतर्गत साधन व्यक्ती म्हणूनहि काम पाहिले. हे सर्व उपक्रम करीत असतांनाच महादवाड गुरूजींनी भारत स्काऊट/गाईड मध्येहि सक्रीय सहभाग ऊत्स्फूतपणे नोंदविला होता. शिवाय गुरूजींनीं शालेयशिक्षणा व्यतिरिक्त मुलांना शारीरिक शिक्षणात कवायतीच्या मानवी मनोरे योगासनांचे शिक्षणहि दिले. रांगोळी स्पर्धा व रंगभरण स्पर्धेतहि मुलींचा सहभाग नोंदविला.
एक उपक्रमशील शिक्षक म्हणून महादवाड गुरूजींना, ज्ञान संवर्धन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासनाचे स्वच्छता दुत, एक तत्ववेता, विचारवंत, पारदर्शी व्यक्तीमत्व, समाजसेवक मा. माधवराव पाटील शेळगावकर यांनी बाबाराव गुरूजी या बहुगुणी गुरूजींना त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांची नोंद घेऊन दि. १.७.२०१६ ते ३०.११.२०२२ पर्यवेक्षक पदी तर दि. १.१२.२०२२ ते सेवानिवृत्तीपर्यंत म्हणजे दि. ३१.०३.२०२३ पर्यंत मुख्याध्यापक म्हणून कै.रामचंद्र पाटील माध्यमिक विद्यालय शेळगाव गौरी येथे नेमणूक करून त्यांचा कार्याचा उचित गौरव करण्यात आला. याशिवाय त्यांच्या कार्याची नोंद घेत संस्थेने त्यांचा वेळोवळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार घडवून आणला.
बाबाराव गुरूजींच्या यशस्वी वाटचालीत त्यांचे मोठे बंधु श्री किशनराव महादवाड यांची प्रेरणा व त्यांची पत्नी सौ.जानकी यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच मुलगा दीपक, सुनबाई सौ. योगिता, मुलगी दीपाली व जावाई गोविंदराव यांच्या सहकार्यामुळेच मला शक्य झालं, असं ते म्हणतात, तर संस्थेतील सर्व शिक्षक बंधु-भगिणी विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. माधवराव पाटील शेळगाव कर व सचिव मा. संजय पाटील शेळगावकर यांच्या प्रेमळ सहकार्यामुळेच मला हे शक्य झाले त्यामुळे मी त्यांच्या, "ऋणातच राहू इच्छितो", असे ते कृतार्थ भावनेने म्हणतात.
"विद्या विनयेन शोभते!" या सुभाषिताला शोभेल अशा विनयशील- कृतत्ववान व विनम्र महाद्वाड सर या मुख्याध्यापकांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा जीवनपट मांडला असून त्यांच्या सेवापूर्ती नंतरच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.आज दि.२ एप्रिल रविवारी रोजी सकाळी ११वा.संस्थेचे अध्यक्ष माधवराव पाटील शेळगावकर यांच्या उपस्थितीत संत ज्ञानेशवर विद्यालय धुपा येथे गौरव सोहळा संपन्न होत आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा