स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार व व्याख्यान सोहळा संपन्न
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवानिमित्त अर्जापूर ता.बिलोली येथे हुतात्मा गोविंद पानसरे यांचे समाधी स्थळी अभिवादन करण्यात आले. तसेच स्वातंत्र्य सैनिकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त होऊन भारतात सहभागी होण्यासाठी मराठवाड्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी अनेक वर्ष लढा दिला होता आपले सर्वस्व गमावून आपल्या मातृभूमीला परकीयांच्या जोखडातून मुक्त करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे आपल्यावर असलेले उपकार आणि त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे अशा स्वातंत्र्यसैनिकांची स्मरण आपल्याला कायम राहील त्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता
याप्रसंगी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा. प्रताप पाटील चिखलीकर समवेत विधान परिषदेचे आमदार राम पाटील रातोळीकर, माजी आ.सुभाषराव साबणे, उपजिल्हाधिकारी सौ. संतोषी देवकुळे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी, भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, सुनील नेरलकर, लक्ष्मणराव संगेवार, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजीराव बच्चेवार, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस विजय गंभीरे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, बिलोली भाजपा तालुका अध्यक्ष श्रीनिवासराव नरवाडे, अरविंद ठक्करवाड, मंडळ अध्यक्ष आशिष नेरलकर, युवा मोर्चाचे सुनील भालेराव, व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा