maharashtra day, workers day, shivshahi news,

१४ मार्चपासून होणा-या संपात जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे - Old Pension Scheme

मराठवाडा शिक्षक संघाचे आवाहन 
Strike teachers and non-teaching staff, Old Pension Scheme, marathwada, naded, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
 जुनी पेंन्शन व इतर मागण्यांसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी शिक्षक समन्वय समितीने 14 मार्च २०२३ बेमुदत संपाची हाक दिली आहे. मराठवाडा शिक्षक संघ या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. अंशदायी पेंन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेंन्शन योजना लागू करणे व इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी हा बेमुदत संप होणार आहे. यासंदर्भात मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष-सुर्यकांत विश्वासराव व सचिव राजकूमार कदम यांनी पत्रक काढले आहे.

अंशदायी पेंन्शन योजना रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंन्शन योजना लागू करावी ही राज्यातील तमाम कर्मचारी वर्गाची मागणी आहेच त्याच बरोबर शिक्षक आणि शिक्षण विषयक अनेक मागण्या प्रलंबित आहेत.  राज्यातील हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वीस बावीस वर्षां पासून विनावेतन वा अंशत: वेतनावर काम करीत आहेत,  प्रचलित अनुदान सुत्र लागू केले जात नाही  त्यामुळे हे शिक्षक  शंभर टक्के अनुदाना पासून वंचित आहेत. उच्च विद्याविभूषित तरूण वीस बावीस वर्षां पासून तासिका तत्वावर अल्प मानधनावर काम करत आहेत ही एकविसाव्या शतकातील वेठबिगारीच आहे.  

शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी,  चतुर्थ श्रेणी कर्मचारी  भरती बंद आहे.  शाळा महाविद्यालयांत शिकवण्यासाठी शिक्षक प्राध्यापक नाहीत तर साफसफाईसाठी सेवक नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  मग शाळा महाविद्यालये चालवायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारच्या नकारात्मक धोरणामुळे  शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांमधे तीव्र असंतोष,  संताप आणि नाराजी निर्माण झाली आहे. 

10,20, 30  या तीन लाभांची आश्वासीत प्रगती योजना शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना लागू करण्यात आली नाही. शासनाच्या शिक्षक आणि शिक्षण विरोधी धोरणांमुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आणि नाराजी निर्माण झाली आहे.  त्यामुळे समन्वय समितीने पुकारलेल्या संपात सहभागी होण्याचा निर्णय मराठवाडा शिक्षक संघाने  घेतला आहे. या संपात सर्वांनी सहभागी होऊन संप यशस्वी करावा 

असे आवाहन विभागीय अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव ,सरचिटणीस राजकुमार कदम,सहचिव सौ.रेखा सोळूंके ,जिल्हाध्यक्ष व्ही.आर.चिलवरवार सचिव रविद्र वाकोडे ,केद्रीय .का.स.जी.पी.कौसल्ये ,ई.डी.पाटोदेकर ,मार्गदर्शक उत्तम लाठकर ,डाॕ .विठ्ठल भंडारे ,विजय खुनिवाड ,शहराध्यक्ष डी.बी.नाईक ,सचिव बी.एम.टिमकीकर ,महिला अध्यक्षा विजयालक्ष्मी स्वामी,एन.एस जयस्वाल, बी.डी.जाधव ,रावसाहेब पाटील ,आनंद मोरे ,गणेश बडुरे ,क्लायमेट अल्ल्डा,एम.एस.मठपती ,हाळदे माणिक ,आर.पी.वाघमारे राजेश कदम,संजय केंद्रे ,गौराजी श्रीगिरे,संजय रेकूलवार,रायकोड नागोराव ,पुलकंठवार,विनोद भुताळे,संभाजी बुड्डे,प्रा.आनंद कर्णे ,शिवानंद स्वामी,शिवराज कदम,आर.पी.ब्याळे,अनिल सुगावकर ,अब्दूल हसिब कालिंदा वायगावकर,प्रज्ञा सांगवीकर  यांच्यासह जिल्हा व तालुक्यातील सर्व पदाधिका-यांनी केले आहे.

 


----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !