दि.वृ.नि.मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष मा.चंपतराव डाकोरे कुंचेलीकर यांचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
राज्यातील दिव्यांग, वृध्द, विधवा, निराधार ,शेतमजुर, शेतकरी, मतदारांनी मतदानाच्या अधिकाराने मतदान करून आमदार व खासदार यांना निवडून आनुन सतेत पाठविले जाते, तेच आमदार, खासदार गोरगरिबांच्या हिताचे निर्णय न घेता आपल्या चार पिढ्याचा विकास झाला पाहिजे म्हणुन आमदार खासदार यांचे मानधन,पेंशन सर्व सोई सवलती एकमताने पास केले जाते.
आपल्या राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा, दिव्यांग, वृध्द, विधवा, निराधारांचा, गोरगरीबांचा, शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा विकास करावा. शासकिय,प्रशासकीय अधिकारी,व कर्मचारी यांना भरमसाठ पगार आसल्यामुळे ते आरामात जिवन जगु शकतात.
मात्र आज कित्येक दिव्यांग,वृध्द,विधवा,निराधार अर्ध्येपोटि जिवन जगणाऱ्यांचा विचार लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार,शासकिय,प्रशासकिय अधिकारी, कर्मचारी यांनी का बरे विचार करत नसतील.
या राज्यात दिनदुबळया दिव्यांगाना कोणतेही काम करता येत नाहि अशाना कुंटुबाचे वार्षिक ऊत्पन्न पन्नास हजार रूपये असावे तसेच वयाच्या ६५ वर्षे जेष्ठ मतदार,किंव्हा निराधारांना कुंटुबातील वार्षिक ऊत्पन्न एकविस हजार व अठरा वर्ष वयाचा मुलागा नसावा असे अनेक निकष लावलेले आहेत.
तसेच दिव्यांग,वृध्द,विधवा,निराधारांना दरमहा एक हजार रुपये अनुदान दिले जाते.आणी लाखो रूपये मानधन, पेंशन, पगार मिळणाऱ्या आमदार,खासदार, शासकिय, प्रशासकिय अधिकारी,कर्मचारी यांना उत्पन्नाची अट नसते. आमदार, खासदारांना लाखो रुपये महिन्याला पुरत नाहीत म्हणुन अनेक व्यवसाय करतात, तर दिव्यांग, वृध्द, विधवा, निराधारांना एक हजार रूपयात महिनाभर कसे जगतील यांचा विचार आमदार,खासदार, शासकिय, प्रशासकिय अधिकारी,कर्मचारी यांनी राज्यातील दिनदुबळ्या दिव्यांग, वृध्द,विधवा,निराधारांचा विचार करावा. व आमदार,खासदार,शासकिय, प्रशासकिय अ़धिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी स्वईच्छेने पेंशन बंद करुन दिव्यांग, वृध्द, विधवा, निराधार दिनदुबळ्या गोरगरीबांचा, शेतमजुर, शेतकऱ्यांचा विकास करावा व आपल्या राज्यात आदर्श घडवावा असे मत दिव्यांग, वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट् संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी व्यक्त केले.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा