दोन ठिकाणी छापा मारून पोलिसांनी जप्त केला जवळपास 24 लाखांचा मुद्देमाल
शिवशाही वृत्तसेवा, नेवासा (प्रतिनिधी विष्णू मुंगसे)
नेवासा तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अफू आणि गांजाची शेती करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. एकाने गव्हाच्या शेतामध्ये व घराच्या परिसरात गांजाची झाडे लावली होती आणि गांजाची पाने घरासमोरच वाळत घातली होती तर एकाने चक्क शेतात अफूची लागवड केली होती. याबाबत माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करून या दोन्ही ठिकाणी छापा मारून जवळपास 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक १४/०३/२०२३ रोजी पोनि श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, नेवासा तालुक्यातील शहापुर शिवारामध्ये बाबुराव साळवे व देवगांव शिवारामध्ये रावसाहेब गिलबिले यांनी त्याचे शेतामध्ये बेकायदेशिररित्या गांजा व अफुचे झाडांची लागवड केलेली आहे.
अशी बातमी मिळाल्याने सदरची माहिती मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांना कळवून त्यांचे सुचनेनुसार व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि / गणेश वारुळे, सफी विष्णु घोडेचोर, पोहेकॉ / मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना/ शंकर चौधरी, संदीप दरदले, पोकों/शिवाजी ढाकणे, ' मोना/भाग्यश्री मिटे, मपोकों/ ज्योती शिंदे व चापोहेकॉ / बबन बेरड अशांनी मिळून नेवासा येथे जावून मिळालेल्या माहितीची खात्री करुन, स्थानिक पोलीस, पंच व इतर साधने सोबत घेवून प्रथम शहापुर ता. नेवासा येथील बाबुराव लक्ष्मण साळवे यांचे शेतात पहाणी केली असता गव्हाचे शेतामध्ये २.५ फुट उंचीची दोन व घरा समोर ८ फुट उंचीचे एक गांजाचे झाड तसेच घरा समोर पोत्यावर गांजाचे झाडाचा पाला काढून तो वाळवण्यासाठी ठेवल्याचे दिसुन आल्यने छापा टाकून आरोपी बाबुराव लक्ष्मण साळवे याचे कब्जातील शेतामधून १,११,४२०/- रु. किंमतीची तीन गांजाची लहान मोठी हिरवी झाडे कारवाई करुन जप्त करण्यात आलेली आहे.
-------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा