नवनियुक्त ग्रामपंचायत ताकबीडचा नावीन्यपूर्ण उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
दिनांक १ फेब्रुवारी
नायगाव तालुक्यात मागील महिन्यात झालेल्या आठ ग्रामपंचायत निवडणुकीत ताकबीड ग्रामपंचायत वर रणजित कुरे गटाने ताबा मिळवला आहे. सरपंचपदी सौं. कल्पना रणजित कुरे ह्या विराजमान झाल्या आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी नावीन्य पूर्ण उपक्रम घेण्याचा संकल्प केला आहे. त्यांनी प्रजासत्ताक दिनी आपला बहुमान वीर जवणाला दिल्याने तालुक्यात त्यांच्या त्यागाची अन सामाजिक भावनेची चर्चा रंगली असतानाच त्यांनी तालुक्यातील आगळी वेगळी संकल्पना मांडली आहे.
ग्रामपंचायत अंतर्गत येणारे कर्मचारी यांची दर महिन्याच्या एक तारखेला बैठक आयोजित करून विकास कामाला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांची तळमळ पाहता त्यांच्या उपक्रमाचे तालुक्यात स्वागत होत आहे.
सर्वसामान्य नागरिकांना केंद्र स्थानी ठेऊन ग्रामपंचायत अंतर्गत सुविधा देणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहेत. या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. यावेळी या बैठकीला तलाठी चमकुरे सर,ग्रामसेवक येरनवार, जि. प.मुख्याध्यापक आवळे सर,शिक्षक पांचाळ सर,कृषीसहायक शिंदे मॅडम, अभियंता कुरे सर,अंगणवाडी कर्मचारी गिरिजाबाई झगडे, अंजलीताई कुरे,सेविका सुमन वरवटे,आशा वंदना वाघमारे, ऑपरेटर रामकृष्ण मोरे,रोजगार सेवक पंढरी इंगळे,पो.पा.गणेश शिरधे,त.मु.अध्यक्ष शिवसांब कुरे,उपसरपंच प्रतिनिधी उमाकांत कुरे ,सदस्य प्रतिनिधी दिंगबर कुरे, लाईनमेन भालेराव, तलाठी सज्जा कोतवाल पिंटेवाड आदींची उपस्थिती होती.
यावेळी सरपंच प्रतिनिधी रणजित पाटील कुरे यांनी गावातील विकास कामासाठी कर्मचारी यांच्याशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या.त्याच बरोबर निळकंठ ताकबीडकर यांनी शासकीय कामाचा आढावा व येणाऱ्या कालखंडात करावयाच्या अपेक्षित सुधारनाबद्दल चर्चा घडवून आणली व गाव विकसित करण्याच्या दृष्ठिने सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा