छावा मराठा युवा महासंघाची कृषी आयुक्ताकडे मागणी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनीधी शिवाजी कंटूरकर)
नांदेड जिल्ह्यासह लातूर औरंगाबाद अमरावती जिल्ह्यात मारुती फर्टेकेम लि.गट नं ६३. गेवराई पैठण रोड औरंगाबाद या खते उत्पादन फॅक्टरीतून रासायनिक २०.२०.० खताची बोगस निर्मिती व विनापरवाना मार्केटमध्ये नांदेड लातूर औरंगाबाद अमरावती या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विक्री केल्या जात आहे विक्री केलेला खत हा बोगस व बनावटी असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही.
एक प्रकारे मारुती फर्टेकेम कंपनीकडून शेतकऱ्याची फसवणूक केली जात आहे खते उत्पादक फॅक्टरीचे मालक व संचालक यांच्याविरुद्ध तात्काळ योग्य ती कारवाई करून सदर बोगस खते निर्मिती व विक्री करणारे मारुती फर्टेकेम लि. कंपनी औरंगाबाद ही फर्टीलायझर्स कंपनी तात्काळ बंद करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन प्रदीप पाटील हुंबाड छावा मराठा युवा महासंघाचे संपर्क प्रमुख यांनी मा. कृषीआयुक्त पुणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे मारुती मिश्रखते रासायनिक दाणेदार खते २०.२०.० या बोगस रासायनिक खताची निर्मिती होत असून सदर खतांमध्ये या संदर्भातील शासकीय नियम व कायद्याप्रमाणे कंटेंटस न वापरता कमी अधिक प्रमाणात वापरून अत्यंत निकृष्ट दर्जाचे व बोगस खताची निर्मिती करण्यात येत आहे सदरील खताच्या बॅगवर खालील प्रमाणे कंटेंटस न वापरता कमी अधिक प्रमाणात वापरून अंत्यंत निकृष्ट दर्जाचे व बोगस खताची निर्मिती करण्यात येत आहे सदरील खताच्या बॅगवर खालील प्रमाणे कंटेंटस व त्याचे प्रमाण लिहिण्यात आलेले आहे.
नत्र ( एकुण )२०% स्फुरद एकुण २०% पालाश एकुण ०% स्फुरद पाण्यात विद्राव्य १०% स्फुरद सायट्रेट विद्राव्य २०% खालील जिल्ह्यातील कृषी सहाय्यक केंद्रातून विनापरवाना मोठ्या प्रमाणात बनावटी व बोगस खताचे विक्री केली जात आहे.
१) सचिन फर्टीलायझर्स सौदने.ता.मालेगाव जि.नांदेड २) वृषभ कृषी केंद्र वडोद बाजार ता फुलंबी जि औरंगाबाद ३) गोयल कृषी केंद्र शिक्रापूर तास शिक्रापूर जि धुळे ४) पल्लवी कृषी आमवाडी ता वाडा.जि ठाणे. सदर बोगस खते उत्पादन व विक्री करणाऱ्या कंपनीचे मालक श्री राघवेंद्र जोशी हे स्वतः महाराष्ट्र फर्टीलायझर्स असोसिएशनचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी पदाच्या पदाचा दुरुपयोग करून कृषी विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून स्वतःच्या कंपनीतून सदरील बोगस खंत २०.२०.० रासायनिक खताचे निर्मिती व विनापरवाना विक्री करीत असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून मारुती मिश्रीत कंपनी तात्काळ बंद करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन मा विभागीय कृषी संचालक पुणे यांना दिले असता त्यांनी तात्काळ मे मारुती फर्टेकेम लि कंपनी औरंगाबाद सबब सदर तक्रार अर्जाच्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करण्याचे आदेश कृषी संचालक निविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण कृषी आयुक्तालय पुणे यांना दिले आहे.
यावर कारवाई न झाल्यास छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने कृषी आयुक्तालय पुणे समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिलेल्या निवेदनात प्रदीप पाटील हुंबाड संपर्कप्रमुख यांनी दिला आहे. मारुती फर्टेकेम लि कंपनी औरंगाबाद या कंपनीवर आता कोणती कारवाई होईल याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
बोगस रासायनिक खते तयार करून शेतकऱ्यांना देशोधडींना लावणाऱ्या कंपनी विरोधात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना समवेत घेऊन महाराष्ट्रामध्ये जण आंदोलन उभारणार असल्याचे प्रदीप पाटील हुंबाड संपर्कप्रमुख छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने मा कृषी आयुक्तालय पुणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा