नातेवाईकांना अश्रू अनावर तर पाहणारेही गहिवरले
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
गाईचे आयुष्यभर पालन करून तिचे दूध खाऊन मन तृप्त व्हावे मनोभावी गोमाता म्हणून पूजन करावे आणि ती भाकड झाल्याच्या नंतर कसाई याच्या हाती देणे ही अधोगती असल्याचे सांगत आपल्या घरी घरची पाळीव गाय ही वृद्ध होईपर्यंत पालन केली अखेर ती मृत्यू पावल्यानंतर आपल्या आईप्रमाणे त्यावर पांडुरंग पाटील उपाशे यांनी अंत्यविधी केलेली आहे हा अनोखा संदेश त्यांनी अनेक गोपालन कर्त्याना दिलेला आहे.
तालुक्यातील मौजे पळसगाव येथील पांडुरंग पाटील उपासे यांनी मनात दुहेरी भूमिका न ठेवता आपल्या घरी असलेली पाळीव गाय तिचे दूध घेऊन मन समाधान झाल्यानंतर ती भाकड झाल्यावर कसाई याच्या हाती न देता त्यांनी तिची मनोभावे पूजा करत अखेर ती वयोमानाने वृद्द होऊन मृत्यू पावल्यानंतर आपल्या घरी जशी आपली आई मेल्यावर अंत्यविधी पार पडल्या जाते तशी त्या वृद्ध गाईची अंत्यविधी केली आहे हा त्यांचा एक भावनिक संदेश सर्वांना या माध्यमातून मिळत आहे.
पांडुरंग निवृत्ती पा उपासे यांच्या वयोवृद्ध गायीचे निधन झाले त्यांनी हिंदू धर्मात गाईला माता मानतात त्याच पध्दतीने गोमात्येप्रती प्रेम दाखवत अंत्यविधी करून समाजासमोर मोठा आदर्श ठेवला यावेळी त्यांच्या शेती अत्यविधीवेळी प्रभाकर पा शिंदे, लक्ष्मण पा. उपासे संभाजी पा. पानसेवडे आदीसह इतर परिसरातील असंख्य शेतकरी व गावकरी मंडळी उपस्थित होते.
पाळीव वृद्ध गाईची अंत्यविधी करताना पांडुरंग पाटील उपाशे आणि त्यांच्या नातेवाईकांच्या डोळ्यात अश्रू अनावरण झाले होते. तेव्हा अनेकांचे मनही हेलावले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा