समाजाच्या विविध स्तरातून अभिनंदन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
शैक्षणिक वर्ष 2022-23 या वर्षातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी NMMS शिष्यवृत्ती परीक्षा नुकतीच पार पडली असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतरगाव येथील इयत्ता आठवीतील पाच विद्यार्थी सदरील परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत.
त्यात कु. भाग्यश्री गुणाजीराव शिंदे, आकाश शिवाजी शिंदे, कु. पूनम सुभाष शिंदे, कु. अश्विनी गणेश नावंदे, प्रवीण भिमराव हणमंते या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे जि.प. शाळेचे मुख्याध्यापक दमकोंडवार सर, कदम सर, मोहन शिंदे सर, शिवाजी शिंदे सर, सूर्यवाड सर, शिंदे मॅडम, सुवर्णकार मॅडम, किशन पचलिंग सर व अंबुलगे सर सर्वांनी उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे अभिनंदन केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा