जि.प.प्राथमिक शाळा धामदरी शिक्षक विद्यार्थ्यांचा उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा या उद्देशाने विद्यार्थी शिक्षक शा.पो.आ.मदतनीस यांच्या श्रमदानातून सेंद्रिय परसबागेची निर्मिती करून त्यामध्ये पालक,मेथी,कांदा,लसूण,कोथिंबीर,फूलकोबी, पानकोबी, कद्दू, शेवगा,लिंबू,मिरची,वांगे,टमाटे,नारळ, कारले,दोडका.. इत्यादी फळभाज्या व पालेभाज्या यांचा समावेश आहे. शिक्षक स्वखर्चाने श्रमदानातून बनवली परसबाग. शालेय पोषण आहारात परसबागेतीलच भाजीपाला वापरला जातो शुद्ध शेंद्रीय पद्धतीने पिकवलेला फळ भाज्या व फळे यांची लागवड केली आहे. . विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी त्याचबरोबर त्यांचे भविष्य सुधारावे तसेच त्यांचा आरोग्य व सुसृतीत व्हावे त्याचबरोबर पोषण आहाराची सकस आहार मिळावा यासाठी शाळेतील शिक्षकांची जबाबदारी त्यांनी केलं पोषण आहाराच्या चांगला खाद्य व चांगले पदार्थ देण्यासाठी शिक्षकांनी शाळेच्या बागेतच परसबाग निर्माण करून उत्कृष्ट फळभाज्या व ताज्या फळे भाज्याची निर्मिती करून शाळेतील मुलांना ते सकस आहार म्हणून पुरविले जात आहे
हे उत्कृष्ट कार्य शाळेतील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी एकोप्याने सुरुवात केली आणि शाळेतील विद्यार्थ्यांना सकस आहार मिळायला लागला एक आधुनिक प्रकारचा उपक्रम शाळेचे शिक्षकांनी केल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामधेरी तालुका अर्धापूर येथील शिक्षकांनी एक वेगळा उपक्रम करून आपल्या शिक्षक पेशांना एक चांगली व वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे शिक्षक पेशा म्हणजे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणे त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याची व येणाऱ्या संकटाशी सामना करण्यासाठी सुदृढ आरोग्य निर्माण व्हावे अशी शिकवण देणारे आदर्श शिक्षक यांनी पोषण आहाराची जबाबदारी आग घेऊन स्वतःच्या खर्चातून स्वखर्चातून परसबागेची निर्मिती करून उत्कृष्ट भाग निर्माण करून पोषण आहारा चांगल्या प्रकारे निर्मिती केली व विद्यार्थ्यांना हा पोषण आहार घरोघरी वाटप केला त्यामुळे या शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा