काही ठिकाणी बिनविरोध तर काही ठिकाणी रस्सीखेच होण्याची शक्यता
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील 8 ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी मरवाळी,सातेगाव, सुजलेगाव रुई खुर्द,अंतरंगाव,ताकबीड, पिंपळगाव, या आठ गावातील उपसरपंच ची जिल्हा अधिकारी नांदेड यांचा आदेश दिल्यानंतर निवड होणार आहे.
मुदत संपलेल्या आठ ग्रामपंचायतची निवडणूक 18 डीसेंबर, रोजी मतदान व 20 रोजी निकाल जाहीर करण्यात आला. सदर ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच थेट जनतेतून निवडण्यात आले. मरवाळी येथुन छायाबाई केशव पवळे,रुई खुर्द भगवान जाधव,सुजलेगाव दत्ता आईलवार,अंतरगाव गजानन पा तोडे,ताकबीड कल्पना रणजीत कुरे,तलबीड जयश्री दासरवाड,पींपळगाव शेख जैतनबी इस्माईल,हे उमेदवार जनतेतून सरपंच पदासाठी निवडून आले.
वरिल आठ गावातील उपसरपंच पदासाठी निवड उद्या होणार आहे. उपसरपंच निवड करण्यासाठी शेख लतीफ विस्तार अधिकारी नायगाव, तालुक्यातील महेश मुखेडकर,कानोडे,एम जिरवनकर, सय्यद एम एस, एम जी जोंधळे, विस्तार अधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा