दामाजी करखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांचेहस्ते प्रशांतजी परिचारक यांचा सत्कार
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
पंढरपूर अर्बन बँक, पंढरपूर या बँकेची निवडणूक प्रशांतजी परिचारक यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली. त्यानिमित्ताने मंगळवेढा तालुक्यातील समविचारी आघाडिच्या माध्यमातून दामाजी करखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांचे शुभहस्ते पॅनल प्रमुख प्रशांत परिचारक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी बोलताना चेअरमन शिवानंद पाटील म्हणाले की वित्तीय संस्थामध्ये पंढरपूर अर्बन बँकेची कामगीरी नेहमीच नेत्रदिपक राहिलेली आहे. स्व.सुधाकरपंत परिचारक मालक यांच्या काळापासून पंढरपूर अर्बन बँकेची बिनविरोध निवडीची परंपरा असुन विद्यमान चेअरमन मा. प्रशांतजी परिचारक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बँकेच्या सभासदांनी सदरची निवडणूक बिनविरोध केली आहे. या बँकेच्या पुढील वाटचालीसाठी चेअरमन शिवानंद पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
सदर प्रसंगी दामाजी शुगरचे व्हाईस चेअरमन तानाजीभाऊ खरात, जिजामाता पतसंस्थेचे प्रमुख संचालाक रामकृष्ण नागणे, जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य युनुसभाई शेख, दामाजीचे संचालक औदुंबर वाडदेकर, पी.बी.पाटील (सर), भाजपाचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, भाजपाचे शहराध्यक्ष गोपाळ भगरे, भारत बेदरे, बसवराज पाटील, तानाजी काकडे, भिवा दोलतडे, सुरेश कोळेकर, राजेंद्र चरणू पाटील, दिगंबर भाकरे, दयानंद सोनगे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, पं.स. माजी उपसभापती काशिनाथ पाटील, न. पा. पक्षनेते अजित जगताप, न.पा. शिक्षण मंडळाचे माजी सदस्य नंदकुमार हावनाळे, रा. कॉ. अल्पसंख्याक सेलचे पश्चिम महा. प्रभारी लतिफ तांबोळी, रा.यु. कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे, नगरसेवक प्रविण खवतोडे, रावसाहेब फटे, आ. प्रशांत परिचारक युवा मंचचे अध्यक्ष बबलु सुतार, शरद पुजारी, उत्तम घोडके, पिंटु शिंदे, शेखा कोकरे, विजय शिंदे. इ. मान्यवर उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा