सोमठाणा येथे गरुड महिला ग्राम संघाचा वतीने राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले जयंती साजरी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील सोमठाणा येथील सभागृहात आयोजित गरुड महिला ग्राम संघाची सर्व साधारण सभा घेण्यात आली. महिलांनी उधोग व्यवसाय सुरू करावे. पंचायत समिती नायगाव यांच्या मार्फत गटाला लाखों रुपये खर्च उपलब्ध करून देण्यात येईल. आसी माहिती गटविकास अधिकारी आर एल वाजे यांनी सांगितले. सोमठाणा येथील सभागृहात महिलांनी राजमाता जिजाऊ यांची व सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती साजरी करण्यात आली होती. या सर्व साधारन सभेत बोलत होते. 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त महिला बचत गटांच्या वेळोवेळी बातम्या फोटो उद्योग व्यवसाय ची प्रसिद्धी दिली बदल आज पत्रकार अनिल कांबळे कुंटुरकर यांचा सन्मान सत्कार बिडीओ आर एल वाजे यांनी केले आहे.
यावेळी सोमठाणा येथील सभागृहात दिनांक 6 जानेवारी रोजी 10 वा. आयोजित महिला ग्राम संघाची सर्व साधारण सभेला नायगाव पंचायत समिती चे गटविकास अधिकारी आर एल वाजे यांच्या प्रमुख उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका व्यवस्थापक मलेश येडके, बाबु चंद्रकांत डोळे, ग्रामविकास अधिकारी धनराज केते, सरपंच चांगुनाबाई शंकर कदम, जिवन पाटील कदम ईरवंत सुर्यकर, गंगाधर मोरे, ICRP सोनुताई कदम, बॅंक सखी शिवमाला पंचलीग, शंकर शिरसे, सेवक ईलाई रसुल शेख, शब्बीर शेख पाणी पुरवठा कर्मचारी, ग्राम संघाचे अध्यक्ष सचिव गटातील महिला उपस्थित होत्या.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा