वाहतुकीचे नियम आणि रस्ते सुरक्षितता याबाबत जनजागृती साठी हेल्मेट घालून मोटरसायकल रॅली
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील शिवराज पाटील होटाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ होटाळा संस्थे अंतर्गत सर्व शाळेतील मुलांना व नायगाव शहरातील मो टरसायकल धारकांना रस्ता सुरक्षा अभियान 2023 प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड च्या वतीने मिलेनियम पब्लिक स्कूल येथे रस्ता सुरक्षा वाहनाचे नियम पालन काय करावे व कसे करावे यांचे मार्गदर्शनसाठी या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. श्री. संदीप निमसे (सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड) यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवराज पा. होटाळकर.मा.श्री.संदीप निमसे साहेब यांनी हिरवे झेंडे दाखवून मोटार सायकलची रॅली नायगाव शराहतून काढण्यात आली
सर्व वाहतूक नियमाचे पालन करून आणि हेल्मेट परिधान करून मोटरसायकलची मोठ्या प्रमाणात रॅली करण्यात आली. यावेळी उपस्थित परिवहन कार्याचे अधिकारी उपस्थित होते तसेच प्रा. फाजगे केवी सर प्रा. घोगरे सर प्रा. सूर्यवंशी सर प्राचार्य कोतेवार सर मुख्याध्यापक कल्याण सर शिवराज पा. मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेश पा. पवार. राहुल पा. नकाते. गंगा जी पा. मुगावकर. शिवाजी पा. पवार. दत्ता पा. ईजगावकर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंद पवार सर. इंद्रावे सर. आनंद वल्ले सर. इत्यादी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद पवार सर. मोरे डीएम सर .यांनी केले.
सदर कार्यक्रम घडून आणण्यात श्री अविनाश राऊत (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी )मा. श्री. संदीप निमसे.( सहायक प्रादेशिक परिवाहन अधिकारी नांदेड.) रत्नाकर ढोबळे. (मोटर वाहन निरीक्षक नांदेड.) आशिष जाधव. साहेब (मोटार वाहन निरीक्षक नांदेड.) तसेच नायगाव शहरातील मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे मुख्य वाहक ड्रायव्हर व हिरो होंडा शोरूम चे मालक मिली नियम पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज नायगाव चे पूर्ण शिक्षक वर्ग व विद्यार्थी तसेच पत्रकार दिलीप वाघमारे. पत्रकार प्रकाश हनुमंते. पत्रकार निळकंठ जाधव. पत्रकार विकास भुरे. पत्रकार महादेव धडेकर. पत्रकार हनुमंत चंदनकर. पत्रकार अडकिने. पत्रकार शिवाजी कुंटूरकर. पत्रकार रोहित बरबडेकर. मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा