' वेड ' नी लावलंय सगळ्यांनाच वेड
मागील काही वर्षापासून संगीत क्षेत्रात सातत्याने नवनवीन प्रयोग करीत रसिकांना कर्णमधुर संगीताची मेजवानी देणाऱ्या अजय - अतुल या मराठमोळ्या संगीतकार जोडीने मराठी पासून हिंदी पर्यंत सर्वच ठिकाणी आपला ठसा उमटविला आहे. अजय - अतुलचं संगीत हे चित्रपटाचे वैशिष्ट्य ठरत आहे. मुंबई फिल्म कंपनीची निर्मिती असलेल्या आणि महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित केलेल्या ' वेड ' या चित्रपटात नाही अजय -अतुल च्या जादुई संगीताचा स्पर्श लाभला आहे.
अजय अतुल यांनी गुरु ठाकूरच्या साथीने या चित्रपटासाठी गीत लेखन केलं असून, अजय गोगावले, अरमान मलिक, वसुंधरा व्ही, श्रेया घोषाल, विशाल दादलानी यांच्या आवाजात ' वेड ' मधील गाणी संगीतबद्ध केली आहेत. यात एकूण चार गाणी आहेत. सलमान खान आणि रितेश यांच्यावर चित्रीत झालेल्या व विशालच्या आवाजातील " वेड लावलंय...." या गाण्याने संगीत प्रेमींना खऱ्या अर्थाने वेड लावले आहे. याखेरीज ' वेड तुझ्या....,' ' सुख कळले...,' आणि ' बेसुरी 'ही गाणी ही रसिकांच्या पसंतीस उतरली आहेत.
' वेड ' च्या गीत - संगीताबाबत रितेश म्हणाला की अजय - अतुल हे मला भावासारखे आहेत. ' लय भारी ' आणि ' माऊली ' पासूनचे ऋणानुबंध ' वेड ' च्या निमित्ताने अधिक दृढ झाले आहेत. संगीता सोबत चित्रपटाचं दिग्दर्शनही समजावून घेऊन हे दोन संगीतकार काम करतात. स्क्रीन प्ले गतिमान करणारं असल्याचंही रितेश म्हणाला. जेनेलिया चा पहिला मराठी चित्रपट असलेल्या वेळ मध्ये अशोक सराफ , विद्याधर गोखले, शुभंकर तावडे , जिया शंकर आदीच्याही भूमिका आहेत. प्रेमाची नवी परिभाषा सांगणाऱ्या या चित्रपटातील गीत - संगीताचा बाजही गुलाबी प्रेमाचा नवा रंग उधळणार आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा