अबब ..... सोलापुरात आला तब्बल १ कोटींचा रेडा - कृषी प्रदर्शनातील रेड्यासोबत सेल्फी काढण्यासाठी झूबंड गर्दी

आजकाल कोणासोबतही सेल्फी काला जातो , अगदी रेड्या सोबतसुद्धा 

one crore Reda , gadda yatra ,solapur, shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा सोलापूर 

एकदा रेडा दीड टन वजनाचा असू शकतो ..... त्याला दररोज दोन हजार रुपये लागतात आणि किंमत एक कोटी हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही . पण हे खरं आहे . सोलापुरात गुरुवारी राजस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या निमित्यानं खास सोलापूरकरांसाठी हा रेडा भेटीला आला आणि लोकांच्या पाहण्यासाठी व त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चक्क उड्या पडल्या . 

कर्नाटकातील बेळगाव जिल्यातील मंगसुळी [ ता. तागवड ] च्या विलास गणपती नाईक या हौशी पशुपालकां हा रेडा पळाला आहे. पशुपालन हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. गेल्या अनेक वर्षा पासून त्यांच्याकडे पंधरा म्हशींचे पालन केले जाते. पाच वर्षापासून विलास नाईक यांनी चक्क हरियाणात जाऊन एक मुरा जातीची म्हैस  १ लाख ४० हजार रुपयांना खास पालनासाठी गावी आणली . तिच्यापासून या गजेंद्र रेड्याचा जन्म झाला. त्याला अगदी घरच्या प्रमाणे सारे नाईक कुटूंब सांभाळतात. त्याचा दिवसाचा खर्च २ हजार रुपये आहे .कुटुंबातील सदस्याप्रमाणे दररोज त्याची निगा राखली जातजाते. त्याचा हा रुबाब पाहून अनेकांनी त्याला दीड कोटी रुपयांना मागितला ; मात्र नाईक यांनी ती किंमत अपेक्षेपेक्षा कमी वाटते . 

दररोज दोन हजार रुपये खर्च 

या गजेंद्र रेड्यासाठी दिवसाकाठी दोन हजार रुपयांचा खर्च आहे . दिवसभरात २ किलो सफरचंद , १५ लिटर दूध , ३ किलो पेंड असे खाद्य लागते . त्याला प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी ५० हजार रुपये मानधन दिले आहे .

रेड्याच्या वडिलांचे नाव आहे म्हणे युवराज ..... 

नाईक यांनी हरियाणातून जी म्हैस आणली तिच्यापासून गजेंद्र रेड्याचा जन्म झाला . त्याच्या हरियाणात असलेल्या वडिलांचं नाव युवराज असल्याचं सांगत , महाराष्ट्र व कर्नाटक या रेड्याला अनेक ठिकाणी निमंत्रण येतात . त्याला आतापर्यंत एक कोटीला मागणी आली आहे . मात्र, आपण याला हरियाणात जाऊन विकणार असून, तेथे यापेक्षा अधिक किंमत मिळेल , अशी अपेक्षा विलास नाईक यांनी व्यक्त केली. 

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !