पिण्याच्या पाण्यात आला तेलाचा तवंग, प्रशासन मात्र ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रमात व्यस्त
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड ( मिलिंद कुमार लांडगे )
कन्नड तालुक्यातील बनशेंद्रा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणपोई येथील लघु पाझर तलावात अज्ञात व्यक्तीने मंगल कार्यलयात उरलेले उष्ट अन्न, पत्रवाळी,प्लास्टिकचे ग्लास, चिरलेले वांगे, फ्लॉवर, भेंडी, मटकी भाजी, शिळा भात व तळलेले पदार्थ पिकअप गाडीने आणून टाकल्याने पाण्यावर तेलाचा तवंग आढळून आला त्यामुळे गावाकऱ्यात संतापाचे वातावरण पसरले होते कारण गावाला पिण्याचे पाणी पुरवठा करणारी विहिर याच तलावात असून याच तलावाचा काठावर अंगणवाडी व हाकेच्या अंतरावर वस्तीशाळा असून या बालगोपालांनाही याच ठिकाणावरून पाणी उपलब्ध होते त्यामुळे या तेलकट पाण्यातून विषबाधा होऊ नये म्हणुन व काही दुर्घटना घडू नये म्हणुन गावाकऱ्यांनी व ग्रामपंचायतीने लेखी निवेदन एम.आय.अनमाड, कंनिष्ठ सहाय्यक अभियंता सिंचन विभाग, तहसीलदार, पोलीस विभाग यांना दिले असून, त्यामुळे काही दुर्घटना घडू नये म्हणुन सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, गावकऱ्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे व काही दुर्घटना घडल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशांनाची राहील असेही कळविले आहे.
पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात अज्ञात व्यक्तीने सडलेले अन्न वाहनाद्वारे आणून टाकले आहे त्यामुळे पाण्यावर तेलकट पणा आला असून पाण्यातून विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणुन संबंधित विभागासह प्रशासनाला लेखी निवेदन देऊन दोशीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
- अविनाश कोकणी (ग्रामविकास अधिकारी )
बनशेंद्रा ग्रामपंचायतणे आमच्या कार्यालयास लेखी निवेदन याबाबतीत दिले असून दोषी असणाऱ्या लोकांवर आम्ही कायदेशीर कारवाई करन्यासाठी वरिष्ठ कार्यालयास तसा प्रस्ताव पाठवणार आहे वरिष्ठ कार्यालयाचा निर्णय आल्यावर काय कारवाई करता येईल ते तपासून कारवाई नक्की केली जाईल.
- व्ही. पी.कांबळे (उपविभागीय जलसंधरण अधिकारी, कन्नड)
अधिकारी निवडणूक कार्यक्रमात व्यस्तकन्नड तालुक्यात ग्रामपंचायतचा बिगुल वाजला असून ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमांस सुरुवात झाल्याने आज निवेदन देण्यास गेल्याल्या गावकर्यांना बहुतेक कार्यलयात कोणी भेटले नाही त्यामुळे ग्रामविकास अधिकारी अविनाश कोकणी यानी व्ही. पी.कांबळे उपविभागीय जलसंधरण अधिकारी यांना भ्रमनध्वनीद्वारे संपर्क साधला व त्यांच्या कार्यालयात एम आय अनमाड, कंनिष्ठ सहाय्यक यांच्याकडे लेखी निवेदन सरपंच अंबादास मोरे, ग्रामविकास अधिकारी अविनाश कोकणी, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कांबळे यानी गावकरी व ग्रामपंचायच्या वतीने निवेदन दिले असून पाणी प्रदूषित करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा