राजमाता जिजाऊंच्या सिंदखेड राजा तालुक्यात ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज - 30 पैकी 20 ठिकाणी महिला सरपंच
शिवशाही वृत्तसेवा बुलढाणा प्रतीक सोनपसारे
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात राज्यभर भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जागा जिंकत क्रमांक एकचा पक्ष म्हणून मान्यता मिळवली असली तरी बुलढाणा जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाचे वर्चस्व पाहायला मिळत आहे बुलढाणा जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने 68 ग्रामपंचायतीवर ताबा मिळवत जिल्ह्यात पहिला क्रमांक प्राप्त केला असून 49 जागांसह भाजपा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 32 ग्रामपंचायतीमध्ये आपलं सरपंच बसवला असून काँग्रेसच्या वाट्याला 22 जागा आले आहेत
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे शेतकरी मेळावा घेऊन ग्रामपंचायत निवडणुकीच्या आधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वातावरण निर्मिती केली होती तरीही उद्धव ठाकरे शिवसेना मात्र पाचव्या क्रमांकावर फेकली गेली असून उद्धव ठाकरे घटना फक्त अकरा जागांवर समाधान मानावे लागले आहे इतर स्थानिक आघाड्यांनी 97 ग्रामपंचायतीवर ताबा मिळवला आहे
मातृतीर्थ भूमीमध्ये महिलाराज
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हा तालुका राजमाता जिजाऊ माँ साहेबांची माहेर असल्याने या भूमीकडे अवघा महाराष्ट्र आदराने पाहतो याच मातृतीर्थात आता महिलाराज पाहायला मिळणार आहे सिंदखेड राजा तालुक्यातील 30 ग्रामपंचायत पैकी तब्बल वीस ग्रामपंचायत मध्ये महिला सरपंच निवडून आले असून दहा ठिकाणी पुरुष सरपंच झाले आहेत राजकारणात महिलांचा वाढता टक्का मातृत्व सिंदखेडराजांमध्ये अधोरेखित झाल्याचे दिसते
अपक्ष सरपंचांवर बड्या नेत्यांची नजर
खरंतर ग्रामपंचायत निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नाहीत परंतु त्या त्या भागातील नेते लोकप्रतिनिधी यांचा प्रभाव असलेल्या व्यक्ती ग्रामपंचायत मध्ये सत्ता स्थापन करतात त्यावरून त्या ग्रामपंचायत मध्ये पक्षाची सत्ता आली असे समजले जाते मात्र बऱ्याचदा ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक आघाड्या गावगाड्यातील नेते यांच्या आघाड्या यावरच गावचे राजकारण अवलंबून असते त्यामुळे ग्रामपंचायत मध्ये पक्षांच्या विपरीत सरपंच आणि सदस्य निवडून येत असतात परंतु निवडून आलेल्या सरपंचावर हक्क सांगण्यासाठी मात्र पक्षाचे नेते धावाधाव करत असतात यावेळीही महाराष्ट्रात असेच चित्र पाहायला मिळत आहे पक्ष विरहित निवडून आलेल्या स्थानिक आघाडीच्या सरपंचाला बडे नेते आपल्या कार्यालयात बोलवून हार घालून त्या ग्रामपंचायत आपलीच सत्ता आल्याचे भासवण्याचा प्रयत्न करतात यामुळे नेत्यांचा हेतू साध्य होत असला तरी निवडून आलेले सरपंच मात्र संभ्रमात पडत आहेत
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा