आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या सासरकडच्या मंडळींवर गुन्हा दाखल
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड ( मिलिंद कुमार लांडगे )
९ महिन्यापूर्वी विवाह झालेल्या विवाहितेस माहेराहून ट्रॅक्टर घेण्यासाठी २ लाख रुपये घेऊन ये म्हणून शारीरिक मानसिक छळ करून त्रास केल्याने या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने तिच्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बालखेडा ता कन्नड येथे दि.२५ रविवार रोजी दुपारी घडली, सिमा प्रदीप कोठावले वय २२ वर्ष असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून सासरच्या मंडळीवर पिशोर पोलीस ठाण्यात दि.२६ सोमवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील माहिती अशी की, गणेशपूर येथील सिमा हिचा ९ महिन्यापूर्वी प्रदीप शिवसिंग कोटवाले रा. बालखेडा ता. कन्नड येथील प्रदीप कोठवले यांच्याशी ९ महिन्यापूर्वी विवाह झाला,
विवाहा नंतर सर्व सुरळीत असतांना पती प्रदीप शामसिंग कोठावळे, सासरा श्यामसिंग भागचंद कोठावळे,सासू देविका शामसिंग कोठावळे, जेठ रणजीत शामसिंग कोठावळे, जाऊ नीता रणजीत कोठावळे यातील आरोपीतांनी तीन महिने चांगले वागविले त्यानंतर तुझ्या वडिलांनी मुळ पलटीला ला चांगले कपडे घेतले नाही, तुला स्वयंपाक करता येत नाही, तुझे वडिलांनी लग्नात चांगली भांडीकुंडी दिली नाही
लग्नात हुंडा म्हणून पैसे मागितले असता पैसे दिले नाही, तसेच वेळोवेळी बोलून शिवीगाळ करून माहेर कडून ट्रॅक्टर घेण्यास दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणून सिमाचा शारीरिक मासिक छळ त्रास करून त्रास दिल्याने त्याच्या छळाला व त्रासाला कंटाळून सीमाने दि २५ रविवार रोजी दुपारी तिचा राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली,अर्जुन प्रकाश खोलवर रा. गणेशपूर वय २८ ता कन्नड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पिशोर पोलीस ठाण्याच्या स.पो.नि. कोमल शिंदे करीत आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा