जंगी कुस्त्यांनी झाला यात्रेचा समारोप
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड ( मिलिंद कुमार लांडगे )
कन्नड तालुक्यातील करंजखेडा येथे राज्यातील भोई समाजाचे आराध्य दैवत श्री भोईदेव उर्फ ताऊबा महाराज यांची भव्य यात्रा महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. पहाटे पासून या यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली.
या निमित्ताने पहाटे पासून पूजा अर्चा, अभिषेक, नवस फेडणे, तकतराव, वाघ्या मुरळी, गाणी, पोवाडा आदी सह इतर उपक्रम राबविण्यात आले. या यात्रेस राज्यातून लाखो भाविक दर्शनसाठी येतात. दिवसभर नवस फेडणे आणि त्याची जेवणावळी सुरू होत्या. मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शना चा व प्रसादाचा लाभ घेतला . विविध मान्यवरांनी देखील या यात्रा महोत्सवाला उपस्थितीती लावली होती .
भोईदेव यात्रा उत्सव कमिटीच्या अंतर्गत , जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला विविध ठिकाना वरून आलेल्या मल्लांनी थरारक कुस्त्यांचे प्रदर्शन करुन आपले कौशल्य दाखवत कुस्ती रसिकांची प्रशांसा मिळविली. यातूनच एखादा पैलवान महाराष्ट्र केसरी किंवा हिंदकेसरी होऊन समाजाचा आणि राज्याचा गौरव करेल हा आशावाद ठेवून भोईदेव यात्रा उत्सव कमिटीच्या माध्यमातून दर दोन वर्षानंतर कुस्तीचे आयोजन करण्यात येत असते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा