महसूल प्रशासन मात्र झोपेत, सरकारी बाबूंचे अर्थपूर्ण दुर्लक्ष
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (शिवाजी कुंटूरकर)
शासनाचा कुठलाच व कसलाही रेती काढण्याचा परवाना नाही परंतु उमरी तालुक्यातील मौजे कौडगाव महाटी यंडाळा या गावातून अवैधरित्या ट्रॅक्टरच्या साह्याने रेती उपसा सरासपणे चालू आहे शासन मालमत्तेची शेकडो ब्रास रेती चोरी होताना महसूल प्रशासन झोपेत आहे कारण गरीब व सर्वसामान्य माणसांना हक्काची घरे व्हावी त्यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील असले तरी अनेक गोरगरिबाची घरे रेती अभावी ओस पडलेली आहेत.
राज्य शासन घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळणार ही घोषणा केली परंतु ती घोषणा हवेतच राहिली. उमरी तालुका रेतीचे माहेरघर बनले आहे कारण तालुक्यातील कौडगाव महाटी यंडाळा ही गावे अतिशय गोदावरी नदी जवळ आहेत या तिन्ही गावाजवळून गोदावरी नदी वाहते सदर तिन्ही गावातून ट्रॅक्टरच्या साह्याने सर्रास रेती उपसा चालू आहे तेव्हा संबंधित महसूल प्रशासन झोपेत का असावे ही एक महसूल प्रशासनाविषयी शोकांतिका आहे.
सदर तीनही गावातून होत असलेली रेती चोरी यांना आळा घालणे हे वरिष्ठांचे अधिकार आहे अनेक ठिकाणची रेती चोरी होत असताना महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी पत्रकार सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते तत्पर होते परंतु त्यांनीच खंडणी मागितली म्हणून विनाकारण त्यांना कायद्याच्या चौकटीत ओविण्यात आले तेव्हा जे होते ते फक्त बघत राहावे अशीच भूमिका महसूल प्रशासनाची दिसून येत आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा