maharashtra day, workers day, shivshahi news,

कुंटूर येथील घोंगडी ने माळेगाव यात्रेत दाखवली चमक

स्वयंसहायता बचत गटाच्या वस्तूंच्या प्रदर्शनात घोंगडी ठरली मुख्य आकर्षण

Malegaon Yatra, bachatgat, ghongadi, kuntur, naigaon, Nanded, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (शिवाजी कुंटूरकर)

 नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील मेंढीच्या केसापासून हात मागाने बनवलेल्या घोंगडीचे प्रदर्शन माळेगावच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या बचत गट स्टॉल मिळाव्यात भरले या मेळाव्यात मुख्य आकर्षण घोंगडीने ठरल्याने जिल्ह्यातील प्रकल्प अधिकारी व सर्व अधिकाऱ्यांनी घोंगडीचे कौतुक झाले . फोटो काढण्याचा त्यांना मोहराला नसून घोंगडी अंगावर टाकून मपरेल बांधून फोटो काढण्याचा मोह त्यांना आवरला नाही. त्यामुळे बचत गटाच्या व माळेगाव यात्रेत भरलेल्या बचत गट मेळाव्यामध्ये मुख्य आकर्षण कुंटुरच्या घोंगडीने चमक दाखवली आहे . 

कुंटुर येथील महालक्ष्मी महिला बचत गट व गिरजाबाई महिला बचत गटामार्फत गेल्या पाच वर्षापासून हाताने घोंगडी बनवले जाते . या घोंगडीसाठी मेंढीचे केसे कापून त्यापासून दोरा विणून सदर घोंगडी हाताने विणले जाते या घोंगडी विणण्यासाठी विज लागत नाही व कोणते यंत्रही लागत नाही. लाकडाने बनवलेल्या यंत्र हात माग याच्यामुळे सदर घोंगडी बनवले जाते.ह दोन्ही गटातील महिला घरी आपल्या मेंढ्या पालन केले जातात त्या मेंढ्याचे केस कापून त्या केसापासून दोरा वळून घोंगडी बनवले जाते . त्यामुळेही घोंगडी गेल्या पाच वर्षांपासून मुंबई महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्याच्या प्रदर्शनामध्ये आकर्षण ठरली आहे. 

 त्याचबरोबर माळेगाव यात्रा तब्बल दोन वर्षानंतर या वर्षी भरले या माळेगाव यात्रेमध्ये सर्व बचत गटाचे स्टॉल व विक्रीसाठी आलेल्या वस्तूचे प्रदर्शन होते यामध्ये मुख्य आकर्षण म्हणून घोंगडीला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळाला असून अधिकाऱ्यांपासून ते सर्व भाविक भक्तांनी घोंगडीचे कौतुक केले व विक्री प्राधान्य दिल्याने विक्रीही जोमात होत असल्याचे स्पष्ट प्रकल्प अधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे माळेगाव यात्रेतही कुंटूरच्या घोंगडीचे मुख्य आकर्षण ठरल्याचे कौतुक सर्वत्र होत असून महिलांनी बनवलेल्या बचत गटाला सध्या मागणी होताना दिसत आहे. त्यामुळे महिला सक्षम बनत आहेत. नायगाव गटविकास अधिकारी आर एल वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली मलेश येडके तालुका अभियान व्यवस्थापक यांच्या मार्फत गटाला लाखों रुपये कर्ज उपलब्ध करून दिली जात आहे. कुंटुर  मध्ये प्रकारे उत्पादित केलेल्या घोंगडीला चांगला भाव व चांगले किंमत मिळत असल्याने महिला बचत गटात आर्थिक मदत मिळत असल्याचेही बोलले जाते 

यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाचे प्रकल्प संचालक डॉ.संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा जाधव, नांदेड जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन पातेवार , जिल्हा व्यवस्थापक दारकादास राठोड, जिल्हा व्यवस्थापक माधव भिसे, ईरवंत सुर्यकर नायगाव तालुका व्यवस्थापक , ICRP रेखाताई अनिल कांबळे कुंटुरकर, महालक्ष्मी महिला बचत गटांच्या अध्यक्ष माळसाबाई वडे, सचिव गंगाबाई महादळे, गिरजामाय महिला बचत गटांच्या अध्यक्ष धुरतबाई वडे , सचिव गोदावरी संभाडे, आदी उपस्थित होते.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !