तिरुपती बालाजी आणि हैदराबाद संस्थान येथून कर्ज मिळवून देतो असे सांगून लाखोंची फसवणूक करणारा भामटा गजाआड

पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल, आरोपी अमोल बाळकृष्ण कौलगे पोलिसांच्या ताब्यात

tirupati balaji trust loan , Fraud of millions, pune, solapur, shivshahi news, pandharpur police, PI dhananjay jadhav,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर 

गरजूंना बालाजी संस्थान आणी हैदराबाद येथून कर्ज मिळवून देतो असे सांगुन ज्ञानेश्वर दत्तात्रय रासकर रा. नानगाव ता. दौंड, जि. पुणे यांची 23 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली म्हणुन पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण येथे तक्रार दाखल केली होती, त्या अनुषंगाने चौकशी आंती अमोल बाळकृष्ण कौलगे रा. पिराची कुरोली ता. पंढरपूर यांच्याविरुद्ध पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण येथे गु. र. न. 263/2022 भा. द. वी. क. 419, 420 अन्वये फसवणूक केल्या बाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा नोंद केल्याची आरोपीला कुणकुण लागताच आरोपीने अटकपूर्व जामीनसाठी मा. सत्र न्यायालय पंढरपूर येथे अर्ज केला होता. परंतु मा. न्यायालयाने सदर आरोपीचा जामीन फेटाळला होता. 

त्यानंतर आरोपी जामीनसाठी पुन्हा मा. उच्च न्यायालय मुंबई येथे अर्ज केला परंतु गुन्ह्यातील गांभीर्य, आणि केलेली फसवणूक विचारात घेऊन मा. न्यायालयाने  आरोपीचा जामीन फेटाळला होता. त्या नंतर दि. 26/12/2022 रोजी आरोपी अमोल बाळकृष्ण कौलगे हा पिराची कूरोली परिसरात आल्या बाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेवुन सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे. 

आरोपीस मा. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तपासकामी 31/12/2022 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे. गुन्ह्याच्या तपास पोलीस उप निरीक्षक दिलीप शिंदे करीत आहेत.

tirupati balaji trust loan , Fraud of millions, pune, solapur, shivshahi news, pandharpur police, PI dhananjay jadhav,
नागरिकांना याद्वारे कळविण्यात येते की, अमोल बाळकृष्ण कौलगे रा. पिराची कुरोली ता. पंढरपूर याने आणखी कोणाची फसवणूक केली असेल तर नागरिकांनी धनंजय अ. जाधव, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण (लिंक रोड) येथे संपर्क साधावा असे पोलिसांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !