डॉ.अमजद खान पठाण यांच्या हस्ते तहसीलदार सुनिल सावंत यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिक सोनपसारे)
सिंदखेडराजा हजरत दस्तगीर बाबांच्या 42 व्या वर्षों उत्सव निमित्ताने गुरुवर्य अंल्हाज असद बाबा यांच्या स्मूती प्रित्यर्थ मातृ तीर्थ सिंदखेडराजा येथे 15 व 16 डिसेंबरला आरोग्य शिबिर घेण्यात आले यावेळी या शिबिरात कर्करोग संशयित अकरा हजार रूग्णांची तपासणी करण्यात आली हजरत गौस ए आजम दस्तगीर बाबा बहुउद्देशीय संस्था सिंदखेडराजा असनाज हेल्थकेअर एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन मुंबई लायन्स क्लब ऑफ जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने 15 व 16 डिसेंबरला मोफत कर्करोग आणि नेत्ररोग तपासणी उपचार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
यात 15 महिलांना स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान करण्यात आले तसेच त्यांच्या पुढील उपचाराची हमी देण्यात आली तसेच या शिबिरामध्ये झालेल्या कार्यक्रमात सिंदखेडराजा तहसील चे तहसीलदार सुनिल सावंत यांना समाजरत्न पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार त्यांना डॉक्टर अमजद खान पठाण अय्याज खान मुकेश सुकेश यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला
यावेळी रुगण्यासाठी सर्व व्यवस्था मोफत उपलब्ध करून देण्यात आली होती
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा