शिवजयंती दिवशी होणार पहिला प्रयोग
शिवशाही वृत्तसेवा, मुंबई-गोरेगाव
वास्तव क्रियेशन प्रस्तुत श्री, अधिश स्वप्निल मेस्त्री निर्मित , सुरज हातणकर लिखित दिग्दर्शित - "कन्यादहन" शोध स्त्री अस्तित्वाचा... या नाटकाचा शुभारंभाचा नारळ २७ नोव्हेंबर २०२२ रोजी संपन्न झाला. हा कार्यक्रम गोरेगाव आदर्श नगर, आर ए कॉलनी, अष्टविनायक क्लासेसमध्ये संपन्न झाला. श्री महेश सोनावने यांनी या कार्यक्रमासाठी उत्तम असे सहकार्य केले. हा कार्यक्रम १५-२० कलारांच्या उपस्थितीत यशस्वी संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरवात गणेशपुजन, नटेश्वरांना मान वंदन करून करण्यात आले. कन्यादहन या नाट्यप्रयोगामध्ये काम करणारे कलाकार, संगीतकार यांनी आपले मनोगत व्यक्त करून आम्ही या नाटका मध्ये आनंदाने कामं करायला तयार आहोत असे अश्वासन दिले. कलर्स मराठी फेम अभिनेते हेमंत लाडगे यांनी देखील या कन्यादहन नाटकासाठी एक उत्तम भूमिका साकारनार आहेत. या नाट्य कलाकृती मध्ये खुप असे नवखे कलाकार आपल्याला कामं करताना दिसणार आहेत.
कन्यादहन ही कथा सत्य परिस्थितीवर आधारित आहे.
" या नाटकाचा शुभारंभ प्रयोग दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ शिवजयंती निमित्त गाव -शेंबवने ता. राजापुर जि. रत्नागिरी या ठीकाणी होणार आहे. " लेखन / दिग्दर्शन / संवादलेखन - सुरज हातणकर याने केलं आहे. सह-दिग्दर्शक - जयेश कातकर आणि सुरज कुवार करता आहेत. कलाकृती म्हटली कि संगीत आलंच या नाटकासाठी संगीत साथ करतोय तो छोटा कलाकार सर्वेश लोळगे सह सुरज कुवार , नाटकासाठी सर्वात मोठा भाग म्हणजे नेपथ्य तर ते संभाळतायत - प्रमोद सूर्यवंशी सह अक्षय घाडी , रंगभुषा - स्वरूप बाईत आणि सोनाली शिंदे, वेशभूषा - जयेश कातकर आणि सोनाली शिंदे , प्रकाश योजना - विजय माळी , साउंड - सिद्धेश निखारंगे, आणि या कार्यक्रमाच संपूर्ण चित्रिकरण वास्तव क्रियेशन चा कॅमेरामन विनय फटकरे करणार आहे.
या कार्यक्रमासाठी आज प्रमोद सूर्यवंशी, सुरज हातणकर, जयेश कातकर, साईनाथ बाईत, सुरज कुवार, श्रीशैल सुतार, विनय फटकरे, अमन जाधव, सर्वेश लोळगे, अमोल, प्रथमेश पत्की, हेमंत लाडगे, सुशांत लोंढे, ऋतुजा सांगाले, आरोही आव्हाड, पायल जाधव, पद्मिनी आव्हाड इत्यादी कलाकार उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी होण्यास सहकार्य केले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा