संत दामाजी साखर कारखान्याच्या चालु हंगामातील १,००,००१ साखर पोती पुजन समारंभ संपन्न
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा ( राज सारवडे )
श्री संत दामाजी कारखान्याचे सन २०२२-२३ गळीत हंगामामध्ये दि २७/१०/२०२२ ते ३१/१०/२०२२ या कालावधीत गळीतासाठी आलेल्या ऊसास पहिला ॲडव्हान्स हप्ता प्र मे टन रु २३००/- प्रमाणे शेतक-यांच्या खातेवर धनश्री पतसंस्था मंगळवेढा व त्यांचे विविध शाखामध्ये जमा केला असुन तोडणी वाहतूकीचे दि २७/१०/२०२२ ते १५/११/२०२२ या कालावधीतील दोन मस्टरचे बिल जिजामाता पतसंस्था, मंगळवेढा येथे जमा केले असुन दि १/११/२०२२ ते १५/११/२०२२ या पंधरवाडयाचे ऊसाचे ॲडव्हान्स बिल चार दिवसात वरीलप्रमाणे पतसंस्थेत जमा करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री शिवानंद यशवंत पाटील यांनी सदर प्रसंगी बोलताना दिली चालु गळीत हंगामामध्ये उत्पादीत झालेल्या १,००,००१ व्या साखर पोती पुजन प्रसंगी ते बोलत होते
पुढे बोलताना ते म्हणाले, चालू गळीत हंगामामध्ये कमीत कमी म्हणजे २८ दिवसांमध्ये १ लाख मे टन गाळप करुन कारखाना उभारणीपासुनचा उचांकी गाळपाचा विक्रम केलेला आहे कारखान्याच्या दैनंदिन गाळप क्षमतेपेक्षा जास्त गाळप दररोज होत आहे साखर उताऱ्याच्या बाबतीत सोलापूर जिल्हयामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आपला कारखाना आहे कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व किसनलाल मर्दा वकीलसाहेब व संस्थापक व्हा चेअरमन स्व रतनचंद शहा शेठजी यांनी उभी केलेली संस्था आम्ही चांगल्या प्रकारे चालवित आहोत कोणत्याही प्रकारचा उपपदार्थ निर्मिती नसताना आपण इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊसदर देत आहोत जेष्ठांचे मार्गदर्शन, सभासद-शेतकरी, ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेचे ठेकेदार, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्यामुळेच संचालक मंडळाने ठरविलेले गाळपाचे उद्षि्ठ पूर्ण होणार आहे कारखान्याचा हंगाम संपेपर्यंत गळीतास येणाऱ्या ऊसाचे बिलापोटी रु २३००/-प्रति टन प्रमाणे ॲडव्हान्स बिल वेळचे वेळी देणार असलेची मी संचालक मंडळाचेवतीने खात्री देत आहे तरी संचालक मंडळाने ठेवलेले गाळपाचे उद्षि्ठ पुर्ण करण्यासाठी सभासद,शेतक-यांनी आपला ऊस दामाजी कारखान्यासच गळीतास देवून सहकार्य करण्याचे आग्रहाचे आवाहन चेअरमन श्री शिवानंद पाटील यांनी शेवटी केले
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये धनश्री परिवाराचे मार्गदर्शक प्रा श्री शिवाजीराव काळुंगे म्हणाले, सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे साखर कारखान्यात उत्पादीत झालेल्या १ लाख पोती पुजनाचा असतो दामाजी कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी कालावधीत १ लाख मे टनाचे गाळप झाले आहे आणि हे कौतुकास्पद आहे कारखान्याच्या संचालक मंडळाला भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण, गरज लागली तर माझी नेहमी सहकार्याची भावना असेल कितीही अडचणी असल्या तरी सकारात्मकतेने पाहिल्यास यश हे निश्चीतच मिळत असते या संचालक मंडळाने ठरविलेले गाळपाचे उद्षि्ठ निश्चीतच पार पडेल हा विश्वास व्यक्त करुन प्रा शिवाजीराव काळुंगे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या
कार्यक्रमाचे प्रास्तावीक व स्वागत कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री सुनिल दळवी यांनी केले सदर प्रसंगी मयत सभासदांचे वारसांना नुकसान भरपाईचा चेक मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आला
सदरहू पोती पुजन कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे माजी चेअरमन ॲड नंदकुमार पवार,जिजामाता पतसंस्थेचे प्रमुख श्री रामकृष्ण नागणे, रतनचंद शहा बँकेचे व्हा चेअरमन श्री रामचंद्र जगताप, कारखान्याचे व्हा चेअरमन श्री तानाजी खरात, संचालक सर्वश्री प्रकाश पाटील, औदुंबर वाडदेकर, मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणू पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर तसेच पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष श्री लतिफ तांबोळी, माजी संचालक श्री अशोक माळी, सिध्दापूरचे चंद्रकांत सोनगे, सुधीर करंदीकर, कार्यकारी संचालक श्री सुनिल दळवी, खातेप्रमुख, विभागप्रमुख , कर्मचारी, कामगार संघटना व पतसंस्थाचे पदाधिकारी, सभासद-शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री अशोक उन्हाळे यांनी केले तर आभार संचालक श्री दिगंबर भाकरे यांनी मानले
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा