maharashtra day, workers day, shivshahi news,

विविध उपक्रमांनी आमदार समाधान आवताडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा - ९४१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

 "रक्तदान करा,जीव वाचवा" या आमदार आवताडेंच्या हाकेला कार्यकर्त्यांची धाव

mla samadhan autade, birthday, blood donation camp, mangalwedha, shivshahi news

शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (राज सारवडे)

संकल्प रक्तदानाचा मानवसेवेचा हा संकल्प घेऊन मित्रपरिवार पक्ष सहकारी हितचिंतक कार्यकर्ते यांनी भेटवस्तू हारतुरे, केक,होर्डिंग,बॅनर या स्वरूपातून शुभेच्छा देण्यापेक्षा रक्तदान करून जिल्ह्यात असलेला रक्ताचा तुटवडा भरून काढा व लोकांचे जीव वाचवा असे आवाहन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी कार्यकर्त्यांना केल्यानंतर त्यांचा आवाहनाला प्रतिसाद देत पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील 941 एवढ्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करत रक्तदान रुपी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, सकाळी अवताडे शुगर कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांच्या हस्ते रक्तदान शुभारंभ करण्यात आला.

त्याचबरोबर आमदार समाधान आवताडे यांच्या यांच्या 46 व्या वाढदिवसानिमित्त मतदार संघामध्ये विविध कार्यक्रम घेऊन त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये मतदार संघातील जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना वैष्णवी अर्थमूव्हर्स चे मालक राजकुमार सुडके यांनी 27 हजार वह्यांचे वाटप करून शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर पंढरपूर येथील कार्यकर्त्यांनी दीड हजार विद्यार्थ्यांची आमदार मॅरेथॉन स्पर्धा व नागरिकांनी विठ्ठल मंदिरासमोर महाआरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे भोजन देण्यात आले.

आवताडे शुगर येथे वृक्षारोपण करण्यात आले .आमदार आवताडे यांनी हार तुरे शाल, फेटा न आणता सध्या जिल्ह्यात तुटवडा भासत असलेल्या रक्ताचा साठा भरून काढण्यासाठी रक्तदान करून मला शुभेच्छा द्या असे आवाहन केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदार संघातील रांजणी,शिरनांदगी,मंगळवेढा या ठिकाणी रक्तदान आयोजन करून  941 इतक्या रक्तदात्यांनी रक्तदान देत त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला असून रक्तदात्यांच्या रांगा सुरूच होत्या. दिवसभर रक्तदाते संपले नसल्यामुळे आज कासेगाव येथे पुन्हा रक्तदानाची कॅम्प केली आहे.अक्षय ब्लड बँक ,रेवनील ब्लड बँक यांनी रक्त साठा केला आहे.

हा कार्यक्रम उत्साही पणे पार पाडण्यासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे ,बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे,विराज आवताडे,पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप खांडेकर, माजी व्हाईस चेअरमन अंबादास कुलकर्णी, मिस्टर सभापती सुधाकर मासाळ, दत्तात्रय जमदाडे, भाजपचे जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण, बाबा कोंडूभैरी,सुहास पवार,कैलास कोळी,सरोज काझी,पिनू,आवताडे,अविनाश मोरे,दादा,ओमणे,शिवाजी सावंजी, सोमनाथ सावंजी,चंद्रकांत पडवळे,दत्ता भोसले,सिद्धेश्वर दत्तू, युवराज शिंदे, तात्या मस्के ,श्याम पवार, दिगंबर यादव, प्रशांत घोंगडे,सनी पवार,बंडू आवताडे, प्रकाश रोहीटे, सुरेश भाकरे भारत निकम, राजकुमार सुडके,  नवनाथ शिंदे , विनोद लटके, सुदर्शन यादव,आदित्य हिंदुस्तानी, सुशांत हजारे ,सत्यजीत सुरवसे ,दीपक सुडके,बापू डोंगरे, कपील हजारे,यांचे सह ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांनी आदींनी परिश्रम घेतले.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !