एकमताने आणि बिनविरोध झाल्यानंतर काळेबाग याचा सत्कार
शिवशाही वृत्तसेवा, खर्डी
सांगोला तालुका शेतकरी शिक्षण मंडळ सेवकांची सह . पतसंस्था मर्यादित लोटेवाडी चे सचिव मोरे विलास महादेव हे वयोमानाने दि . ३१/१०/२०२२ रोजी सेवानिवृत झाले . सेवानिवृत्त झाले नंतर पतसंस्थेच्या ठरावा प्रमाणे सचिव पदाचा राजीनामा दिला .त्यांचा सत्कार पतसंस्थेचे संचालक नंदकुमार घाडगे यांचे हस्ते करण्यात आला .
नूतन सचिव पदी सिताराम महाराज विद्यालय खर्डीचे लिपीक मुकुंद काळेबाग यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचा सत्कार पत संस्थेचे विद्यमान चेअरमन आनंदा रोंगे यांचे हस्ते करण्यात आला . सदर निवडी प्रसंगी पतसंस्थेचे संचालक गायकवाड एम . एस . , कांबळे आर डी सर, घाडगे एम . एन . सर , पाटील एन .व्ही . सर , कुंभार एन . एच . सर तसेच संचालिका सौ . कुलकर्णी डी डी व सौ . नवले आर . व्ही उपस्थित होते . यावेळी नुतन पदाधीकार्यांचे अभिनंदन करण्यात आले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा