दसऱ्यानिमित्त विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूरविजय दशमी निमित्त विठ्ठलाच्या खांद्यावर घोंगडी बाजूला चांदीची काठी तर रुक्मिणी माते विजयादेवी सोन्याची साडी असा पारंपारिक पोशाख करण्यात आला होता. त्याचबरोबर मंदिरातील विविध भागात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असल्याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली आहे.
हिंदू सनानिमित्त मंदिरात विविध प्रकारचे आकर्षक सजावट करण्यात येते त्याच पद्धतीने दसऱ्यानिमित्त राम जांभुळकर ( राहणार पुणे ) या भाविकातर्फे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झेंडूच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे. या आकर्षक सजावटीमुळे मंदिरात आणखीन उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याचबरोबर पांडुरंग व रुक्मिणी मातेच्या मूर्तीला आकर्षक पोशाख व अलंकार घालण्यात आले होते.
परिवार देवतांनाही आकर्षक पोशाखविजयादशमी दसरा निमित्त विठ्ठला पारंपारिक पोशाख, सोन्याचे पितांबर, घोंगडी, चांदीची काठी व अलंकार रुक्मिणी माते विजया देवी सोन्याची साडी, पारंपारिक पोशाख व अलंकार घालण्यात आले होते. तसेच परिवार देवता मधील सत्यभामामाता, राधिकामाता, महालक्ष्मीमाता व व्यंकटेश या देवतांना पारंपारिक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आले आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा