बारा तासाच्या आत मंगळवेढा पोलिसांनी लावला प्रकरणाचा छडा
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (राज सारवडे)
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे जमिनीच्या हव्यासापोटी जावयानेच आपल्या सासूचा खून केल्याची घटना घडली असून घरावर सशस्त्र दरोडा पडला आणि त्यात या महिलेचा खून झाला असा बनव जावयाने केला होता मात्र मंगळवेढा पोलिसांनी चतुराईने तत्काळ तपास करत गुन्ह्याचा छडा लावला असून आरोपी जावयाला ताब्यात घेतले आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 23/10/2022 रोजी पहाटेच्या सुमारास नंदेश्वर तालुका मंगळवेढा येथे शाकुबाई मारुती कोकरे (वय 47 वर्ष रा. नंदेश्वर ता. मंगळवेढा जि.सोलापुर) हिचा रहाते घरात गळ्यावर चाकूने भोकसुन अज्ञात दरोडेखोराने खुन केल्याची माहिती मंगळवेढा पोलीस ठाण्यास मिळाली . सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील ,पोलीस निरीक्षक रणजीत माने , सपोनि बामणे, सपोनि वाघमोडे, सपोनि आवटे, सपोनि पिंगळे, पोसई धापटे, पोसई शेख, पोहेकॉ गायकवाड, पोहेकॉ हेंबाडे, पोना पवार, पोना दुधाळ, पोना मोरे, पोकॉ तांबोळी, पोकॉ माने अशा पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट दिली, असता पत्र्याच्या घरामध्ये मयत महिलेस टेकवुन बसविले होते व महिलेच्या गळ्यावर धारधार शस्त्राने (चाकुने) वार केलेला होता. त्यामुळे तिचे केस, कपडे, अंथरुण रक्ताने माखलेले होते. व तिच्या बाजुस झोपलेल्या ठिकाणी एक धारदार मोठा चाकु रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेला दिसला.
त्यावेळी पोलीसांनी तेथील लोकांकडे चौकशी केली असता घरामध्ये चोर दरोडेखोर घुसुन मारुन पळुन जात होते त्यावेळी आम्ही त्यांच्या पाठीमागे घराच्या मागे गेलो असता लाईट बॅटऱ्या चमकलेल्या दिसल्या असे सांगीतले पोलीसांनी त्याप्रमाणे तपास केला परंतु काहीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे तेथील घटनास्थळाचा व परिस्थितीचा अभ्यास करुन मयताचा जावई दादा उर्फ राजाराम बाबुराव शेजाळ याच्यांकडे व त्याच्या पत्नीकडे चौकशी केली असता त्या दोघांच्या बोलण्यामध्ये तफावत आढळुन आली. त्यावेळी पोलीसांना जावयाचा संशय आल्याने त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता मयताचा जावाई दादा उर्फ राजाराम बाबुराव शेजाळ याने शाकुबाई हिचे वडील राजाराम शेजाळ यांचे नावे असलेली पाच एकर जमीन नावावर करणे करीता अंगठा का देत नाही. या कारणावरून शाकुबाईचे गळ्यावर चाकु भोकसुन तिचा खून केल्याचे समोर आले. गुन्हा लपवण्याच्या इराद्याने अज्ञात चोरट्याने खुन केल्याचा बनाव केल्याचे निष्पण झाले. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर आरोपी दादा उर्फ राजाराम बाबुराव शेजाळ यांने सदर गुन्ह्याची कबुली दिली. त्यास पोलीसांनी ताब्यात घेवुन अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सपोनि बामणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी सोलापुर ग्रामीण पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, , अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने मंगळवेढा पोलीस ठाणे, सपोनि अमोल बामणे, सपोनि अंकुश वाघमोडे, सपोनि सत्यजित आवटे, सपोनि बापुराव पिंगळे, पोसई धापटे, पोसई सलिम शेख, सपोफी दत्तात्रय तोंडले, सपोफी पाटील, पोहेकॉ सुनिल गायकवाड, पोहेकॉ दयानंद हेंबाडे, पोना बापुराव पवार, पोना ईश्वर दुधाळ, पोना सुनिल मोरे, पोकॉ रफिक तांबोळी, पोका सोमनाथ माने पोका राजु आवटे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अमोल बामणे, मंगळवेढा पोलीस ठाणे हे करीत आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा