चिखली खामगाव दरम्यान किन्ही फाट्याजवळ एसटी बसचा अपघात
शिवशाही वृत्तसेवा बुलढाणा (प्रतीक सोनपसारे)
चिखली ते खामगाव दरम्यान किन्ही फाट्याजवळ एसटी बसचा अपघात झाला असून बारा प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की, अमरावती ०१ आगाराची बस चिखलीहून खामगावच्या दिशेने जात असताना किन्ही फाट्याजवळ ऑटो रिक्षाला वाचवण्याच्या नादात रस्त्याच्या कडेला नाल्यात गेली.
बुधवारी पाडवा आणि भाऊबीजच्या दिवशी सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान हा अपघात घडला. ऑटो रिक्षाला वाचवण्याच्या नादात, बस रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात गेली आणि समोर असलेल्या एका खांबावर जोरात आदळली या अपघातात बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले असून, 12 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना खामगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले असून, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा