पोलीस दलाचे आधुनिकीकरण ; पोलीस क्रीडा अकादमी उभारण्याचा निर्णय
शिवशाही वृत्तसेवा, मुंबई
2020 मधील 7231 पदांसाठी पोलीस महासंचालकाकडून भरती प्रक्रिया सुरू असून आणखीन बारा हजार पोलिसांची भरती करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी तातडीने सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत सोमवारी दिले.
राज्यात 2019 मधील 52 97 पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया पूर्ण होईल प्रशिक्षण सुरू आहे. पोलीस ठाण्याची संख्या वाढवण्याबरोबरच पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. पोलिसांसाठी क्रीडा अकादमी उभारण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय ही बैठकीत झाला.
नवीन पोलीस ठाण्याच्या उभारणीसाठी सर्वकष आराखडा तयार करा, पोलीस दलासाठीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावेत. यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. लाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्रलंबित असलेली परवानगीची प्रकरणे निकाल काढण्यासाठी संबंधित विभागांना सूचना देऊन याबाबत उचित कार्यवाही करावी, असे निर्देश फडणवीस यांनी या बैठकीत दिले.
फेक माथाडी, वसुली सम्राटांना चाप लावणारराज्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी फेक माथाडी चळवळ फोफावत आहे., यामुळे माथाडी तथा वसुली सम्राटांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला त्यांनी दिले.
-------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा