श्री विठ्ठल प्रशालेत ध्वजारोहण समारंभ संपन्न
शिवशाही वृत्तसेवा वेणुनगर
श्री विठ्ठल प्रशाला व कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. अभिजित धनंजय पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रशालेचे प्राचार्य मा. श्री. व्ही. जी. नागटिळक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले. याप्रसंगी बोलताना मा. श्री. अभिजित धनंजय पाटील म्हणाले की, 15 ऑगस्ट 1947 ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीतून भारतमाता मुक्त झाली तो हा दिवस स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नाही त्यासाठी अनेक वीर जवानांनी प्राणाचे बलिदान दिले.
आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना इतिहासात पाठीमागे वळून पाहिले असता आपल्या देशाने सर्वच क्षेत्रात अनेक आघाडीवर दैदिप्यमान प्रगती केलेली आहे. आपल्या देशाचे स्वातंत्र्य आणि प्रगतिचा नावलौकीक टिकविण्यासाठी तुम्ही विदयार्थ्यानी स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहचवण्याचे व भ्रष्टाचार मुक्त बलशाली भारत घडवायचा असेल तर प्रत्येक भारतीयांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्यास या देशाचे स्वातंत्र्य आबादित राहील. त्यासाठी दृढनिर्धार आणि एकजुटीचीच गरज असल्याचे सांगितले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा