प्रशालेतील लहान मोठ्या ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
पंचरत्न इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये दही- हंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला . दही हंडी कार्यक्रमात प्रशालेतील जवळ जवळ ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सर्वप्रथम प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीता मोहोळकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अन्याय, अत्याचार वाढेल तेव्हा तेव्हा धर्मरक्षणार्थ स्वतः श्रीकृष्ण पृथ्वीवर अवतार घेतील. असे श्रीकृष्ण भगवंताने प्रतिपादन केले आहे.
तसेच भगवान श्रीकृष्ण व राधा यांचे निस्वार्थ प्रेम कशापद्धतीचे होते. याबद्दल मार्गदर्शन केले. यानंतर प्रशालेतील सर्व शिक्षिकांनी तसेच आजच्या कार्यक्रमाच्या राधा- कृष्ण यांनी दही- हंडी चे पूजन केले. नववी व दहवीच्या मुलांनी उत्साहात हंडी फोडली. गोविंदा आला रे, गोविंदा आला या सारख्या अनेक गाण्यावर सर्व विद्यार्थ्यांनी ठेका धरला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षिकांनी कु. वैशाली खपाले , सौ. कविता जगताप, सौ. रश्मी किरपेकर,सौ. श्रद्धा दुरुगकर, सौ. प्रार्थना बेनारे, सौ.प्राजक्ता पवार,सौ. मृणाली जाधव, कु.ज्योत्स्ना आवताडे, कु. मीनाक्षी गायकवाड, सौ.मनीषा थोरात, सौ. वैशाली शिंदे, सौ. कोमल गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा