चेअरमन शिवानंद पाटील यांनी केली नियुक्तीची घोषणा
शिवशाही वृत्तसेवा मंगळवेढा ( राज सारवडे ) शिवशाही न्यूज
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पदावर श्री.सुनिल रामलिंग दळवी यांची नियुक्ती केली असलेची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री शिवानंद पाटील यांनी दिली. श्री. सुनिल रामलिंग दळवी यांचे शिक्षण बी.एस्सी. एल.एल.बी, डी.बी.एम, झाले असून त्यांना साखर कारखानदारीतील प्रदिर्घ अनुभव आहे.
त्यांनी आतापर्यंत सहकारमहर्षि शंकरराव मोहिते पाटील सह.सा.का.लि.अकलूज, लोकनेते बाळासाहेब देसाई स.सा.का.लि. पाटण, सहकार शिरोमणी वसंतराव काळे स.सा.का.लि.चंद्रभागानगर पंढरपूर, मकाई स.सा.का.लि.करमाळा, छत्रपती स.सा.का.लि.इंदापूर, लोकमंगल शुगर इथेनॉल अँड को-जन इंडस्ट्रीज भंडारकवठे, येथे चिफ केमिस्ट म्हणून, तर शरयु ऍग्रो इंडस्ट्रीज फलटण व तात्यासाहेब कोरे वारणा सह.सा.का.लि.वारणानगर येथे प्रोडक्शन मॅनेजर तर कर्मवीर काकासाहेाब वाघ सह.सा.का.लि.नाशिक येथे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या या प्रदिर्घ अनुभवाचा फायदा संत दामाजी साखर कारखान्यास निश्चीतच होणार असलेचे चेअरमन यांनी सांगितले.
श्री सुनिल दळवी यांच्या नियुक्तीनंतर चेअरमन श्री शिवानंद पाटील, व्हा.चेअरमन श्री तानाजी खरात व संचालक मंडळाचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी संचालक सर्वश्री राजेंद्र पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, प्रकाश पाटील, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, अशोक केदार, तानाजी कांबळे, सौ.निर्मला काकडे, तसेच माजी प्र.कार्यकारी संचालक श्री.रमेश गणेशकर, खाते प्रमुख, विभाग प्रमुख उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा