दामाजी सहकारी साखर कारखाना निवडणूक 2022
शिवशाही वृत्तसेवा मंगळवेढा राज सारवडे
मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी व सभासदांचे अर्थिक भूषण असलेल्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्याचे चेअरमन तथा आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्याच्या प्रत्येक गावातील सभासदांशी गटवाईज विचारविनिमय बैठका घेतल्या.
मंगळवेढा तालुक्यातील सत्ताकेंद्र म्हणून आपले वैभव जतन करणाऱ्या श्री संत दामाजी साखर कारखान्याची सूत्रे ताब्यात घेतल्यापासून आ. समाधान आवताडे यांनी अत्यंत काटकसर करून दामाजी कारखाना सुस्थितीत आणला आहे. विद्यमान चेअरमन व संचालक मंडळ यांनी केलेल्या कारखान्याचे भविष्य केंद्रस्थानी ठेवून कारभार केला आहे. सभासद आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हिताचे अनेक सकारात्मक निर्णय घेऊन आ. समाधान आवताडे यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. विद्यमान संचालक मंडळींनी कारखाना चालविण्याची घालून दिलेली आदर्शवत कार्याची पद्धत पुढे चालू ठेवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये उमेदवार निवडताना कामाची गुणवत्ता हाच एकमेव निकष असल्याचेही आ. समाधान आवताडे यांनी बोलताना सांगितले.
गटवाईज झालेल्या विचारविनिमय बैठकीमध्ये प्रत्येक सभेठिकाणी आ. समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळानी केलेल्या कार्याचे कौतुक करून आ. समाधान आवताडे हेच कारखाना सक्षमपणे चालवू शकतात असा विश्वास सभासदांनी बोलून दाखवला. नेमकी हिच कार्यपद्धती कायम ठेवून कारखान्याला आणखी वैभवता प्राप्त करून देण्यासाठी आ. समाधान आवताडे यांच्या विचारांचे जे पॅनल उभे राहील त्यास आम्ही पूर्णपणे पाठींबा देऊ असा शब्दही सभासद बांधवानी आ. समाधान आवताडे यांना दिला. सदर बैठकीसाठी प्रत्येक गावातील सभासद व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा