गोरगरिबांच्या कामाला प्राधान्य द्या - आ. समाधान आवताडे यांनी दिल्या अधिकाऱ्यांना सुचना
शिवशाही वृत्तसेवा राज सारवडे
(उपसंपादक म़गळवेढा विभाग)
कोणतेही पद शोभेचे नाही त्यामुळे प्रत्येक शासकीय अधिकारी व पदाधिकारी यांनी गोरगरीब जनतेला केंद्रस्थानी ठेवून जनतेची कामे, अडचणी सोडविण्यावर भर द्यावा. शासनाच्या पैशाचा वापर सामान्यांच्या विकासासाठी व्हावा अशी अपेक्षा पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे यांनी गावभेटी दौऱ्यादरम्यान व्यक्त केली आहे.
मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेच्या अडी - अडचणी जाणून घ्याव्यात यासाठी आ. समाधान आवताडे यांनी विविध गावभेटी दौऱ्याचे आयोजन केले आहे. गावभेटी दौऱ्याच्या या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी आ. आवताडे यांनी देगांव, शरदनगर, मल्लेवाडी, ढवळस आणि धर्मगांव या गावांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. सदर गावभेटी दौऱ्यादरम्यान आ. समाधान आवताडे यांचेसमवेत तालुका पातळीवरील विविध शासकीय विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागातील जनतेच्या वीज, रस्ते, पाणी आदी बाबींवर आ. समाधान आवताडे यांनी अधिकाऱ्यांना सूचना करून प्रश्न मार्गी लावण्याचे आदेशीत केले.
जनतेची कामे करताना कोणत्याही प्रकारची हयगय न करता प्रत्येक नागरिकास त्यांच्या मूलभूत सोयी - सुविधा मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील रहावे असेही आ. समाधान आवताडे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. जनतेची कामे करत असताना कोणतीही तांत्रिक अथवा प्रशासकीय अडचण निर्माण झाल्यास मी नेहमीच आपणांस सहकार्य करण्यास तयार असल्याचे अभिवचन आ. समाधान आवताडे यांनी दिले आहे.
सदर गावभेटी दौऱ्याप्रसंगी प्रा. येताळा भगत, माजी सभापती प्रदीप खांडेकर, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, मिस्टर सभापती सुधाकर मासाळ, दामाजी शुगर व्हा चेअरमन अंबादास कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, संचालक लक्ष्मण जगताप, राजेंद्र सुरवसे, सुरेश भाकरे, सचिन शिवशरण, राजन पाटील, पप्पू काकेकर, विजय माने, तहसीलदार डॉ. स्वप्निल रावडे, पोलीस निरीक्षक रणजित माने, गटविकास अधिकारी श्रीमती सुप्रिया चव्हाण, दिगंबर यादव, युवराज शिंदे, विनोदराज लटके , प्रा. शरद चव्हाण, आदी मान्यवर त्याचबरोबर आरोग्य, कृषी, महावितरण कंपनी, पोलीस खात्यातील, तहसील कार्यालय, पाणीपुरवठा विभाग, महसूल विभाग, पंचायत समिती विभागातील अधिकारी व पदाधिकारी, वरील गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा