maharashtra day, workers day, shivshahi news,

ना पेट्रोल ना चार्जिंग - गाडी चालते चक्क फुकट - शेतकऱ्याचा ऐतिहासिक जुगाड

मोहोळ च्या शेतकरी पुत्राने बनवली बिना पेट्रोल बिना चार्जिंग ची इलेक्ट्रिक बाइक

No petrol no charging electric bike,  farmer, historic discovery, Research, solapur, shivshahi news,

शिवशाही विशेष

गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात. याच गरजेतून आजपर्यंत अनेक शोध लागले आहेत. सध्या जगावर महायुद्धाचे सावट असल्याने, दिवसेंदिवस इंधनाच्या किमती वाढत चालल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना वाहने वापरणे अवघड होत आहे. इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे, सर्वसामान्य वाहनधारक मेटाकुटीला आले आहेत. यावर उपाय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय समोर आला आहे. मात्र इलेक्ट्रिक बाईक आणि कारच्या किमती खूपच जास्त असतात. तसेच त्यांचा मेंटेनन्स खूप जास्त असतो. ही वाहने काही अंतर गेल्यानंतर चार्जिंग करावी लागतात. त्यासाठी सर्वत्र चार्जिंगची सोय असणे गरजेचे असते, आणि चार्जिंगसाठी वेळही खर्च होतो. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहने वापरणे, सध्या तरी सामान्य माणसाला, व्यावहारिक दृष्ट्या परवडत नाही.

 या सर्व प्रश्नांवर तोडगा काढणारा, अफलातून शोध, एका शेतकऱ्याच्या मुलाने लावला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सोहाळे , तालुका मोहोळ, येथील तरुण शेतकरी दीपक नाईकनवरे, यांनी असे एक उपकरण तयार केले आहे, जे आपोआपच चार्जिंग होते. या उपकरणाद्वारे चालणारी इलेक्ट्रिक बाइक तयार करून तिची यशस्वी चाचणी देखील केली आहे.

दिपक यांचे शिक्षण फक्त बारावीपर्यंत झाले असून, शेतीबरोबरच गेल्या चार पाच वर्षापासून, ते गावात मोटार रिवायडींग चे काम करतात. खेडेगावात वारंवार लाईट जातात. त्यावर विचार करत असताना, दीपक यांनी एक असे उपकरण तयार केले आहे, ज्याला चार्जिंग ची गरज पडत नाही. ते उपकरण स्वतःच आपोआप चार्जिंग होते. या यंत्रावर त्यांनी सुरुवातीला, घरातील इलेक्ट्रिक वस्तू चालवून पहिल्या. बल्ब पासून कुलर पर्यंत अनेक उपकरणे या यंत्रावर चालू शकल्याने, त्यांनी या उपकरणाचा वापर करून इलेक्ट्रिक बाईक बनवायचे ठरवले. दोन ते अडीच महिन्यांच्या अथक प्रयत्नातून, त्यांनी अशी गाडी बनवण्यात यश मिळवले आहे. घरातल्या जुन्या गाडीला त्यांनी हे यंत्र बसवून त्या गाडीची यशस्वी चाचणी घेतली आहे. हे उपकरण गाडीला बसवण्यासाठी 40 ते 50 हजार रुपये खर्च आला आहे. त्यांच्या या उपकरणामुळे इंधना शिवाय आणि कोणत्याही चार्जिंग शिवाय, ही इलेक्ट्रिक बाइक चालते. त्यामुळे इंधन खर्च ,पर्यावरण शुद्ध राखणे चार्जिंग साठी लागणारी वीज आणि वेळ अशी अनेक प्रकारे बचत होते. अर्थातच शंभर टक्के मोफत आणि अमर्याद किलोमीटर चालणारी ही बाईक आहे.

 दीपक नाईकनवरे या अल्पशिक्षित शेतकरी पुत्राचा हा शोध ऐतिहासिक असून या उपकरणाच्या पेटंटसाठी दीपक नाईकनवरे यांनी अर्ज केला आहे. पेटंट रजिस्टर झाले, की या उपकरणाचे व्यावसायिक उत्पादन करण्याचा मानस असल्याचे, दीपक नाईक नवरे यांनी, शिवशाही न्यूज बरोबर बोलताना सांगितले.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !