श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
शिवशाही वृत्तसेवा जळगाव
फैजपूर येथे जय गजानन गृप आयोजित श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त 23 फेब्रुवारी बुधवार रोजी एकदिवसीय श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण आयोजित केले आहे या कार्यक्रमात कराड जिल्हा सांगली येथील श्री जयंत मराठे व सौ संजीवनी मराठे यांच्या रसाळ वाणीतून शिवाजीनगर फैजपूर येथे सकाळी साडे सात ते दुपारी अडीच वाजेपर्यंत होणार आहे. श्री व सौ मराठे यांचा श्री गजानन विजय ग्रंथ जसाच्या तसा तोंडपाठ आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज राहणार आहे.
यावर्षीचा प्रकट दिनाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठी तिथी व तारीख बऱ्याच वर्षातून एकच आलेली आहे आहे. तसेच ग्रंथ नसल्यास वाचण्यापुरता उपलब्ध करून दिला जाईल पारायण करणाऱ्या साठी डॉ अमित हिवराळे,सद्गुरू हॉस्पिटल यांचेकडून भोजनाची व्यवस्था तर सागर चौधरी यांचेकडून फराळ व्यवस्था आहे.शारीरिक दृष्टया बसण्यास असमर्थ आहेत त्यांना पारायणा साठी खुर्चीची व्यवस्था केलेली आहे.
तरी सर्व गजानन भक्तांनी या परायणाचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजक दीपक होले सर,दिनकर नारखेडे,योगीराज नारखेडे,संजय नारखेडे,गिरीश नेमाडे योगेश पाटील तुळशीराम काठोके पिंटू भारंबे,रामभाऊ महाजन,डॉ गौरव धांडे साई एक्सीडेंट हॉस्पिटल, डॉ अभिजित सरोदे गजानन हॉस्पिटल आणि जय गजानन गृप चे सर्व कार्यकर्ते यांनी केलेली आहे.
सर्व कार्यक्रम कोरोना प्रतिबंधात्मक सोशल डिस्टन्स पाळूनच होईल.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा