राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजन
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
महाराष्ट्र परिट धोबी सेवा मंडळाच्या जिल्हा कार्य कारणी सदस्य पदी वैभव ननवरे यांची निवड करण्यात आली राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी विविध निवडी करण्यात आल्या यामध्ये सोलापूर जिल्हा कार्य कारणी सदस्य पदी वैभव ननवरे यांना निवडीचे पत्र परिट धोबी सेवा मंडळाचे पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा संजय दशरथ घोडके व जिल्हा अध्यक्ष अजय सोनटक्के यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले या निवडीबद्दल वैभव ननवरे याच्यावर आनंदाचा वर्षाव होत आहे यावेळी पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजय दशरथ घोडके यांनी परिट समाजाला मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अध्यक्ष अजय सोनटक्के जिल्हा सचिव दत्तात्रय क्षीरसागर युवक जिल्हा अध्यक्ष राजू ननवरे शामराव पाटोळे तालुका अध्यक्ष बाळासाहेब घोडके शहर अध्यक्ष विजय वरपे युवक ता दिगंबर गायकवाड सतीश भोसले रामेश्रर सांळुखे कैलास नवले अमित गायकवाड गणेश ननवरे योगेश घोडके सागर घोडके आप्पा राऊत व बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा