आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक निधड्या छातीचा मराठी लढवय्या - नवनाथ नांगरे
शिवशाही वृत्तसेवा टेंभुर्णी
भारतभूच्या स्वातंत्र्याकरिता अनेक थोरांनी युगपुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अनेकांची नावे इतिहास जमा झाली असली तरी नरवीर आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचा इंग्रज राजवटी विरुद्ध चा लढा आजही अजरामर आहे.
श्री संत रोहिदास आणि जय तुळजाभवानी माध्यमिक आश्रम शाळेच्या मंचावर आज राजे उमाजी नाईक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक तुकाराम यादव सर होते. त्यांच्या शुभास्ते उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी सांस्कृतिक विभागाचे प्रमुख नवनाथ नांगरे सर यांनी आपले मनोगत मांडले. "उमाजी नाईक हे निधड्या छातीचे एक मराठी लढवय्ये होते. सतत १४ वर्ष इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे ते एक आद्य क्रांतिकारक होते. ही भूमी माझी हा देश माझा मी इथला चोर नसून मातृभूमीवर प्रेम करणारा बंडखोर आहे आणि ही भूमी स्वतंत्र केल्याशिवाय माझा श्वास थांबणार नाही . अशा आशयाचे पत्रच त्यांनीं धाडले. आणि स्वातंत्र्याची मेघगर्जना करीत त्यांनी अनेक युवकांना एकत्र करून इंग्रजांशी निकराचा लढा दिला. आजच्या दिवशी त्यांना पकडून फाशी देण्यात आले. अर्थात त्यांना देहदंड देण्यात आला. पण त्यांचे प्राण वाया नाही गेले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हा मराठी लढवय्या कामी आला. या शूर वीरास आद्यक्रांतिकारकास माझा मानाचा मुजरा आणि भावपूर्ण आदरांजली" मी अर्पण करीत आहे .
असे मत यावेळी नवनाथ नांगरे यांनी मांडले. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद पुर्णसंख्येने उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा