नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा तुंगत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी तेजस गोडसे तर उपाध्यक्षपदी आयेशा मुलाणी यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर सरपंच,उपसरपंच मुख्याध्यापक व शिक्षकांच्यावतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा तुंगत येथील शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्घटन प्रत्येकी दोन वर्षानी करावे लागते परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने त्यावेळच्या विद्यमान समितीला पुढे मुदतवाढ देण्यात आली होती.मात्र सन 2020 21 मध्ये शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षण विभागाने शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्घटन करण्याचे सुचवले होते.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुंगत यांनी शुक्रवार दि. 17 रोजी सर्व पालकांना पालक सभेच्या निमित्ताने एकत्र करून पालकांतून आरक्षण पद्धतीने प्रतिनिधींची निवड खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली ,निवड झालेल्या प्रतिनिधीतुन अध्यक्षपदासाठी गुप्त मतदान पद्धतीने तेजस गोडसे यांना ११पैकी ८ तर युवराज इंगळे यांना ३ तीन मते मिळाल्याने अध्यक्षपदी तेजस गोडसे यांची निवड मुख्याध्यापक लहू कांबळे यांनी जाहीर केले.
उपाध्यक्षपदी आयेशा मुलाणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर सदस्यपदी नितीन कोळी, माधुरी बनसोडे, सविता माने, युवराज रणदिवे, रेश्मा शिंदे, युवराज इंगळे, उषा रणदिवे ,सतीश कांबळे ,रामकृष्ण नागणे, तसेच शिक्षक प्रतिनिधी सुचिता माळी यांची निवड करण्यात आली.
नूतन शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सरपंच आगतराव रणदिवे, उपसरपंच डॉ.पंकज लामकाने यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी मागील शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचा ही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक लहू कांबळे, उत्तरेश्वर माळी, आशा गोसावी, गीतांजली येळाई ,मालती कोळी, सुमन साखरे, रोहिणी शिपुरे ,सीमा रोंगे,सुचिता माळी , संतोष रणदिवे ,प्रकाश रणदिवे, संजय रणदिवे ,बापू वनसाळे ,सिद्धु चव्हाण आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन उत्तरेश्वर माळी यांनी तर आभार सुचिता माळी यांनी मानले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा